शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - अकोल्यात कावड यात्रा, राजराजेश्वराला हज़ारों भक्तांचा जलाभिषेक

By admin | Updated: August 29, 2016 13:17 IST

अकोल्यात श्रावण सोमवारचे वेगळेच महत्व आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराला नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून महादेवाला जलाभिषेक केला जातो.

आशिष गावंडे /प्रवीण ठाकरे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ -  भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला मोठे महत्व आहे. श्रावणातील सोमवारी तर राज्यभरात महादेवाच्या भक्तीचा महापूर येतो. अकोल्यात मात्र श्रावण सोमवारचे वेगळेच महत्व आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराला नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून त्याचा महादेवाला जलाभिषेक केला जातो. शेकडो वर्षे प्राचिन असलेली ही परंपरा आजतागायत सुरुच आहे. किंबहुना ही परंपरा अधिकच दृढ होत आहे. शहरातील शिवभक्त रविवारी रात्री तांबे-पितळेचे मोठे कलश घेऊन  येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर गेले होते व तेथील पाणी घेऊन राजराजेश्वराला अभिषेक करण्यासाठी शहरात दाखल झाले हा संपूर्ण प्रवास ते पायीच केला जाते याला कावडयात्रा असे संबोधल्या जाते. ढोल, ताशे, डफडे व इतर चर्मवाद्यांचा गजर करीत शिवभक्त या कावडयात्रेत सहभागी होतात. ‘हर्र बोला महादेव’चा जयघोषाने आसमंत निनादून जातो. ही कावड यात्रा पूर्वी फक्त शेवटच्या श्रावण सोमवारी होत असे. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन १३७ पालख्यांच्या सहभागामुले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत
यंदाच्या कावड यात्रेमध्ये शहरातील डाबकी रोडवरील जय बाभळेश्‍वर शिवभक्त मंडळांची कावड १0१ भरण्यांची (कलश) आहे. डाबकी रोडवासीयांची कावड ४५१ भरण्यांची राहणार आहे. हरिहरपेठ शिवभक्त मंडळाची कावड ३५१ भरण्यांची आहे, तर सर्वात मोठी कावड ही विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल शिवभक्त मंडळाची असून, ती ५५१ कलशांची आहे.