शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

विदर्भातील पहिली मातृ दुग्धपेढी अकोल्यात होणार!

By admin | Updated: September 22, 2015 01:01 IST

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाकडे प्रस्ताव.

नितीन गव्हाळे/अकोला: 0 ते ६ महिने वयोगटातील नवजात बाळाला अनेकदा आईचे दूध मिळत नाही. शिक्षित आईसुद्धा बाळाला दुधापासून वंचित ठेवून, त्याला गायीचं, म्हशीचं, पावडरचं दूध पाजते. नवजात बालकांना आईचं दूध सहजरीत्या उपलब्ध झालं पाहिजे, या उदात्त हेतूने विदर्भातील पहिली मातृ दुग्धपेढी अकोल्यात सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, या दुग्धपेढी निर्मितीसाठीचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागामार्फत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. बाळ जन्मल्यावर सुरुवातीचे काही महिने स्तनदा माता बाळाला दूध देतात. नंतर मात्र चार चौघात बाळाला स्तनपान करताना त्यांना संकोचल्यासारखं वाटतं. काही प्रकरणांमध्ये आईला दूधच नसतं, या कारणांमुळे हळूहळू बाळाला गायीचं, म्हशीचं, पावडरचं दूध दिले जाते. आईचं दूध न मिळाल्याने बाळांची प्रकृती खालावते. बाळाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, बाळाचा बुद्धय़ांक, भावनांकाचा विकास न होणे, वारंवार आजारी पडणं, वजन घटणं आदी समस्या निर्माण होतात. म्हणूनच की काय, नवजात शिशू मृत्यूदराचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही, त्यांच्यासाठी मातृ दुग्धपेढी असावी, अशी संकल्पना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बालरोग विभागप्रमुख डॉ. विनीत वरठे, डॉ. ऊर्मिला देशमुख यांच्यासमोर मांडली. डॉ. वरठे, डॉ. देशमुख यांनीही त्यास सहमती दर्शवून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालकांकडे पाठविला. या प्रस्तावाला वैद्यकीय संचालकांकडून मान्यता मिळेल, असा विश्‍वास डॉ. कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. मान्यता मिळाल्यावर सहा महिन्यात अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मातृ दुग्धपेढीच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती डॉ. कार्यकर्ते यांनी लोकमतला दिली.

काय आहे मातृ दुग्धपेढी?

          बाळाला गरज असते, त्यापेक्षा अधिक दूध मातांना येते. अनेकदा माता दूध काढून फेकून देतात. त्यामुळे अशा मातांना दुग्धदानाविषयी प्रोत्साहित करून हे दूध मातृ दुग्धपेढीत जमा केले जाते. त्या दुधावर प्रक्रिया करून ते साठवले जाते आणि गरजू बालकांना हे दूध दिले जाते. जन्माला येणार्‍या मुलांपैकी अनेक मुले ही कमी वजनाची, मुदतपूर्व जन्माला आलेली असतात. अशा मुलांना दुधाची गरज असते, त्यांना पहिले सहा महिने आईचे दूध मिळाले तर त्यांची प्रकृती उत्तम राहते.