शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सोयाबीनचे उत्पादन घटले!

By admin | Updated: March 17, 2015 01:08 IST

बाजारात दरही पडले; बियाण्यांच्या टंचाईची शक्यता.

अकोला : विदर्भातील सोयाबीनचे उत्पादन ५0 टक्क्याच्या वर घसरले असून, बाजारात दरही पुरक मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पण उत्पादन घटले असताना दर वाढत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून, कमी उत्पादनाचा परिणाम यावर्षी बियाण्यांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विदर्भात यावर्षी शेतकर्‍यांनी १५ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली. पण, पाऊसच नसल्याने सोयाबीन उत्पादकांच्या हाती निराशा आली आहे. सोयाबीनचा उतारा एकरी ९ ते १0 क्विंटल येत होता, तो यावर्षी कमी झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी प्रतिक्विंटल २५४0 च्या वर वाढ झाली नसून, बाजारात प्रतवारीनुसार उत्तम दर्जाच्या सोयाबीनला ३२४0 रुपये दर आहेत. या प्रतिचे सोयाबीन सिंचनाची सोय असलेल्या काही मोजक्याच शेतकर्‍यांकडे असेल; पण ९९ टक्केच्या वर शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय नव्हती. त्यामुळे या शेतकर्‍यांची यावर्षी बाजारात लूट होत आहे. २0१३-१४ ला अतवृष्टीने सोयाबीन काळे पडले तर २0१४-१५ मध्ये पाऊसच नसल्याने सोयाबीनचे बी बारीक झाले. त्यामुळे गतवर्षी सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला होता. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. कीटकनाशके फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना खासगी बाजारात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव २९00 ते ३१00 रुपयांहून पुढे सरकलेले नाहीत. त्यातच प्रतवारीचे निकष लावून सोयाबीन खरेदी केले जात असून, या सोयाबीनला ३२४0 रुपये क्विंटलपर्यंत भाव दिला जात आहे. उर्वरित सोयाबीन मात्र २६00 ते ३000 हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केले जात आहे. एकीकडे सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येते, तर दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे.