शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात खासगी कापूस खरेदीला सुरुवात!

By admin | Updated: October 30, 2016 02:37 IST

पहिल्याच दिवशी ४,९0१ रुपये प्रतिक्विंटल भाव ; खेडा पद्धतीनेही कापूस खरेदी

अकोला, दि. २९- विदर्भात खरीप हंगामातील कापूस वेचणीला सुरुवात झाली असून, दिवाळी सणाचे औचित्य साधून व्यापार्‍यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ४,९0१ रुपये दर दिले. याशिवाय खेडा पद्धतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.राज्यात गतवर्षी ३८ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यावर्षी ३८ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र केवळ १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे; पण चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता कापूस तज्ज्ञ व प्रगतशील शेतकर्‍यांनी वर्तविली आहे. राज्यात मराठवाडा, खान्देश व सोलापूर जिल्हय़ांचा भाग तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्हय़ांत कापूस उत्पादन घेतले जाते. कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकर्‍यांना दिवाळीत हाती पैसा येतो. त्यामुळे शेतकरी कापूस व्रिकी करण्यासाठी खरेदी कें्रद उघडण्याच्या प्रतीक्षेत असतात.विदर्भात अकोला जिल्हय़ात अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खासगी खरेदी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी या भागातील शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला आणला आहे. यावेळी प्रथम कापूस विक्रीला आणणारे भांबेरी येथील शेतकरी सदाशिव भारसाकळे यांचा परंपरेनुसार शाल व नारळ देऊन येथे सत्कार करण्यात आला. तसेच खेडा पद्धती म्हणजे व्यापार्‍यांनी यावर्षी आतापासूनच थेट गावात जाऊन शेतकर्‍यांकडील कापूस खरेदी सुरू केली आहे. यापर्षी कापूस रेचेही कापूस खरेदीसाठी सरसावले आहेत. अल्पभूधारक शेतकर्‍यांचा खासगी खरेदी केंद्रांकडे कलयावर्षी कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र १५ नोव्हेंबरला सुरू होणार असल्याचे पणन महासंघाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खासगी कापूस खरेदी केंद्राचाच सध्या पर्याय आहे. शिवाय, खासगी कापूस खरेदी केंद्रावर हमी दरापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला काढला आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकर्‍यांचे सध्या तरी प्रमाण अधिक आहे. - खासगी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांना सध्या तरी ४,९00 रुपये प्रत्ििक्ंवटलपर्यंत दर दिले जात आहेत.बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.