शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात आता फलोत्पादन बीजोत्पादन!

By admin | Updated: September 17, 2015 23:17 IST

शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर; शेती व उद्यान विद्या प्रशिक्षण प्रकल्पास शासनाची मंजुरी.

अकोला : विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात असून, विदर्भात खरीप, रब्बीनंतर फलोत्पादन बीजोत्पादन प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यास राज्याच्या कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. २0१४-१५ व २0१६-१७ या दोन वर्ष हा प्रकल्प विदर्भात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या प्रशिक्षण प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.शेतकर्‍यांनी स्वत: उच्चप्रतीचे शुद्ध बियाणे निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठाला ८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोत्पादन करण्यात सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोत्पादन निर्मितीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच बीजोत्पादन कार्यक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्याच्या कृषी मंत्रालयाने या विषयावरील प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यासाठीची मान्यता दिली आहे.या प्रकल्पांतर्गत गटशेतीद्वारे विविध शेती, उद्यान विद्या बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अगोदर आदिवासी भागातील शेतकर्‍यांना बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. विविध पिकाचे शुद्ध व उच्च दर्जाचे बियाणे निमिर्तीसाठी या प्रकल्पाला व्यापक स्वरू प देण्याचा कृषी मंत्रालयाचा प्रयत्न असून, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविणे शक्य असल्याने विदर्भातच नव्हे, तर राज्यात बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी आरकेव्हीवाय अंतर्गत अनुदान उपलब्ध करू न दिले जात आहे. विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने या बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात आहे. शेतकरी गटाला यासाठी प्रोत्सहित करण्यात येत आहे. किमान गावातील शेतकर्‍यांची शुद्ध बियाण्यांची गरज भागावी, हा त्या मागील उद्देश आहे.शेतकर्‍यांनी काढलेल्या शेतमालाचे पॅकिंग आणि प्रतवारी करता यावी व शुद्ध बीजोत्पादन करावे, यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरकेव्हीवाय अंतर्गत यावर्षी या कार्यक्रमाला मान्यता मिळाली आहे. शेतकरी गटांना या प्रकल्पात प्राधान्य देण्यात येत असल्याचे कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी सांगीतले.