अकोला : थंडीच्या लाटेने हुडहुडी भरलेल्या विदर्भाला या आठवड्याच्या शेवटी दिलासा मिळाला आहे. गत चोविस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागील आठवड्यात शनिवारी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंशापर्यंत तर शुक्रवारी अकोल्याचे ग्रामीण भागातील किमान तापमान ६ अंशापर्यंत घसरले होते. हे तापमान गुरुवारी ११.७ व १२.५ अंशाने वाढले. गेल्या चोविस तासात राज्यात हवामान कोरडे होते, तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ८.0 अंश सेल्सीअस नोंदवले गेले. विदर्भातील अकोल्याचे तापमान १२.५, बुलडाणा १८.0, वाशिम १५.२, अमरावती १२.८,यवतमाळ १३.४, वर्धा १२.४, नागपूर ११.७, गोंदिया ११.८,चंद्रपूर १७.४, तर ब्रम्हपुरीचे किमान तापमान १३.३ ने वाढले आहे. मुंबई (कुलाबा) १८.५, सांताक्रुझ १४.0, अलिबाग १७.१,डहाणू ११६.५, भिरा ११.0, पुणे ९.५, अहमदनगर १0.५,जळगाव ८.0, महाबळेश्वर १५.९, मालेगाव १२.२,नाशिक ९.७, सांगली १६.१,सातारा १२.१,सोलापूर १६.0, उस्मानाबाद १५.६, औरंगाबाद १६.३, परभणी १४.६,नांदेडचे किमान तापमान ८.५,अंश सेल्सिअस होते.
विदर्भातील किमान तापमानात वाढ !
By admin | Updated: January 28, 2016 20:58 IST