शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक मराठी एकांकिका स्पर्धा १५ व १६ ऑगस्टला अकोल्यात

By atul.jaiswal | Updated: July 25, 2023 18:30 IST

विदर्भातून प्रवेश अर्ज मागवून त्यातील निवडक वीस एकांकिका या स्पर्धेमध्ये सहभागी असतात.

अकोला: नवयुवक क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय संस्था संचालित सिद्धी गणेश प्रोडक्शन या नाट्य संस्थेतर्फे स्वातंत्र्य करंडक विदर्भ स्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा १५ व १६ ऑगस्ट रोजी अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना एक सलाम म्हणून गत नऊ वर्षांपासून दरवर्षी ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. 

विदर्भातून प्रवेश अर्ज मागवून त्यातील निवडक वीस एकांकिका या स्पर्धेमध्ये सहभागी असतात. यामध्ये प्रथम तीन पारितोषिक आणि वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतात. या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून स्पर्धक येत असतात. यावर्षीची स्वातंत्र्य करंडक ही एकांकिका स्पर्धा ही १९ नाट्यसंघांमध्ये होणार असून १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अक्षय पिंपळकर मंदार घेवारे हे प्रयत्न करीत आहेत. रसिक प्रेक्षकांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आयोजक सचिन गिरी यांनी कळविले आहे.

नाट्य संघ आणि एकांकिका

  • "लालटेन "नट श्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन
  • "नमस्कारासन" किरण फाउंडेशन, अकोला
  • "मॅडम" ऊर्जा फाउंडेशन अकोला
  • "गेट वेल सून दामले " हिमा फाउंडेशन अकोला
  • "लेखकाचा कुत्रा" जनकल्याण बहुउद्देशीय संस्था अकोला
  • " शुभमंगल सावधान....." महावितरण सांस्कृतिक मंडळ
  • " दे दान त सुटे गिरान पारमिता अकोला
  • "कॅलिडोस्कोप" अ ब क नाट्य मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती
  • "क्ट" गंधर्व बहुउद्देशीय संस्था अमरावती
  • "मधुमोह "अथ इति नाट्य प्रतिष्ठान अमरावती
  • " नाटेवा न्नसप्र" अभिनव क्रिएटिव्ह ग्रुप बुलढाणा
  • "अनपेक्षित" माणुसकी मल्टी फाउंडेशन, बुलढाणा
  • "ओल्या भिंती "कलाज्ञ थीएटर वर्धा
  • "सैकंड हॅन्ड" नाट्य प्रतीक थिएटर,
  • "मन्वतर"निरामय क्रिएशन्स वर्धा
  • "रात्र काळी" शुभारंभ थिएटर यवतमाळ
  • "ऋण "आर्टिस्ट व्हाया मंच
  • "अ क्वेशन "निओ कास्ट थिएटर नागपूर
  • "दिव्य दान" अभूनी सेवा संस्था नागपूर
टॅग्स :Akolaअकोला