शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाला मिळाले पहिले तणनाशक केंद्र!

By admin | Updated: December 22, 2014 00:22 IST

अकोल्याच्या डॉपंदेकृवि मध्ये होणार नवे संशोधन.

राजरत्न सिरसाट/अकोला : पिकातील उपद्रवी तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी अलिकडच्या काही वर्षात तणनाशकांचा वापर वाढला आहे; परंतु शास्त्रीयदृष्ट्या वापर होत नसल्याने पिकांवर दुष्परिणाम होत आहेत. यावर संशोधन करू न शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पहिले नवे तणनाशक संशोधन केंद्र मिळाले आहे. कृषी क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. हवामान बदल, शेतीसमोरील आव्हाने या विषयावर कृषी विद्यापीठाकडून नवे संशोधन, तंत्रज्ञान उपलब्ध करू न देण्यात आले आहे; परंतु अलिकडे मनुष्यबळाच्या अभावामुळे पीक नियोजन करणे शेतकर्‍यांना अवघड होत आहे. पिकाचे नियोजन करताना, पिकातील उपद्रवी तणांचा नायनाट करणे शेतक र्‍यांसमोर मोठे आव्हान आहे. या तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी विविध तणनाशकांचा वापर करीत आहेत. या तणाच्या बंदोबस्तासाठी यांत्रिकीकरण किंवा मशागतीय पद्धतीचा वापर करतात; परंतु वाढते मजुरीचे दर, त्यांची कार्यक्षमता आणि मजुरांची जाणवणारी कमतरता, यामुळे या परंपरागत पद्धतीने तणाचे प्रभावीपणे नियंत्रण करणे कठीण झाले आहे. म्हणूनच तण नियंत्रणाच्या एकात्मिक पद्धतीबरोबरच रासायनिक तणनाशकांच्या वापरासाठी मोठा वाव असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन आढावा सभा, चर्चासत्रात तणनियंत्रणाच्या शिफारसी केल्या होत्या आणि विदर्भातील शेतकर्‍यांना तणनाशक वापराबाबत संशोधन व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर) परिषदेकडे प्रस्ताव सादर केला होता. आयसीएआर अंतर्गत कार्यरत जबलपूर येथील तण विज्ञान संशोधन संचालनालयाने शनिवारी हे संशोधन केंद्र मंजूर केले आहे. यामुळे विदर्भाला प्रथम आणि राज्याला दुसरे तणनाशक संशोधन केंद्र मिळाले आहे. तणांचा शास्त्रीयदृष्ट्या नायनाट करण्यासाठी आयसीएआरने या कृषी विद्यापीठाला नवे तण संशोधन केंद्र दिले आहे. हा कृषी विद्यापीठावर टाकलेला मोठा विश्‍वास आहे. या माध्यमातून विदर्भ, राज्यातील प्रमुख पिकांतील तणांवर आता प्रभावीपणे उपाययोजना करता येतील, डॉ. पदेकृषीचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले यांनी सांगीतले.