शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शेतक-यांचे कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर भर!

By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST

शेतकरी उत्पादक गट, कंपन्यांचे मागवले प्रस्ताव; ५0 टक्के अनुदान मिळणार.

अकोला : खेड्यातच कृषिमालावर आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले जात असून, यंदाही कृषी उद्योजक गट प्रकल्पांतर्गत निवडलेल्या विदर्भातील शेतकरी उत्पादक गट, कंपन्यांचे प्रस्ताव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) मागविण्यात आले आहेत. या योजनेत शेतकरी गटांना ५0 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राज्यात आत्मा यंत्रणेमार्फत गत पाच वर्षांपासून स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमावर जोर देण्यात आला आहे. यात मुख्यत्वे पीक उत्पादनात वाढ, उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून २0१५-१६ यावर्षी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, याकरिता कृषी उद्योजक गट या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी उद्योजक गटामार्फत निवडलेल्या शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी कंपनीच्या लाभार्थींना कापणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळे प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, तसेच कृषी मूल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरण, कृषी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन विकासाला प्रोत्साहन देणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प उभारण्यासाठी लाभार्थींना अहवाल सादर करावा लागणार आहेत. या कृषी उद्योजकता प्रस्तावामधील प्रकल्प उभारणीसाठी लागणारी यंत्र व उपकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध आहे. यंत्र व उपकरणांसाठी लागणार्‍या खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त १0 लाख रुपये इतके अनुदान शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी कंपनीच्या लाभार्थींना देण्यात येणार आहे.