शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात चंद्रपूर येथे २७ मि.मी. पाऊस!

By admin | Updated: June 25, 2017 08:06 IST

अकोला ३.३ मि.मी.; दमदार पावसाची प्रतीक्षा.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले असून, मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे. मागील चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर येथे २७.0 मि.मी. करण्यात आली आहे. अकोल्यात ३.३ मि.मी. पाऊस झाला आहे.मागील तीन दिवसांपासून विदर्भात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. मान्सूनचे वारे गोंदिया आणि भंडारा जिल्हय़ात पोहोचल्याचे संकेत आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये पुढे गेला आहे. सौराष्ट्रचा काही भाग, गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ उर्वरित भाग, पश्‍चिम मध्य प्रदेशचा काही भाग आणि पूर्व मध्य काही भाग व्यापत आहे. मान्सूनची उत्तरी सीमा (एनएलएम) लॅटमधून उत्तीर्ण होते. त्यामुळे द्वारका, खंडवा, बैतुल, मांडला, पटना आदी भागांत मान्सूनचे वारे वाहत आहेत.दरम्यान, मागील चोवीस तासांत अमरावती येथे ३.४ मि.मी. पाऊस झाला असून, ब्रम्हपुरी ५.६ तर नागपूूर येथे ११.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, वर्धा येथे १.६ मि.मी. पावसाची नागपूर वेधशाळेने नोंद केली आहे.- अकोल्यात तुरळक पाऊस अकोला जिल्हय़ात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील काही मोजक्या भागात हजेरी लावली आहे. पावसाचे स्वरू प हे सार्वत्रिक नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणी थांबविलीआहे; परंतु ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, तेथे पडणारा हा पाऊस पिकांना दिलासादायक ठरत आहे. पिकांना हा पाऊस संजीवनी ठरला आहे. मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकर्‍यांनी केलेली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.