शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

चवताळलेल्या नागीणने घेतला एकाचा बळी

By admin | Published: August 18, 2014 1:32 AM

रविवारी पहाटे अकोला येथील महाकालीनगरमधील थरार

अकोला - मोठय़ा उमरीमधील महाकालीनगरमधील दोरवेकर कुटुंबीय.. रविवारी पहाटे ५ वाजेदरम्यान साखरझोपेत.. याचवेळी त्यांच्या घरामध्ये नाग-नागीणची प्रणयक्रीडा सुरू.. मनोहर दोरवेकर यांचा हात चुकून नाग-नागिणीच्या जोडप्यावर पडला.. त्यामुळे चवताळलेल्या नागीणने मनोहर दोरवेकर यांना चावा घेतला.. अन् काही क्षणातच दोरवेकर कुटुंबातील कर्ता व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच प्रणयक्रीडेत रंगलेल्या नागाने काही कळण्याच्या आतच नागीणलाही गिळण्यास सुरुवात केली. ते पाहून अनेकांची बोटं तोंडात केली..ही दृष्य मोबाईलमध्ये चित्रित करण्याची हौशीही काहींनी भागवून घेतली. मोठय़ा उमरीमधील महाकालीनगरमध्ये रहिवासी असलेले दोरवेकर कुटुंबीय रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास साखरझोपेत होते. दोरवेकर कुटुंबीय ज्या खोलीत झोपलेले होते नेमके तेथेच नाग आणि नागीणची प्रणयक्रीडा (लाग) सुरू होती. मनोहर दोरवेकर झोपेतच असतानाच त्यांचा हात चुकून नाग आणि नागीणवर पडला. या प्रकारामुळे प्रणयक्रीडेत व्यत्यय आल्याने चवताळलेल्या नागीणने मनोहर दोरवेकर यांना चावा घेतला. झोपेत असलेल्या दोरवेकर यांना ते जाणवले नाही. काही वेळातच नागीणने पुन्हा त्यांना चावा घेतला. यावेळी दोरवेकर झोपेतून उठताच त्यांना समोर नाग-नागीणची प्रणयक्रीडा सुरू दिसली. त्यांनी हात आणि पाय बघितले तर त्यावर नागीण चावल्याच्या जखमाही त्यांना दिसल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या मनोहर दोरवेकर यांनी कुटुंबीयांना जागे केले. कुटुंबीयांनी मनोहर दोरवेकर यांना तातडीने रुगणालयात दाखल केले; मात्र त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी, या घटनेची माहिती परिसरात पसरली. काहींनी त्यांच्या घरामध्ये येऊन मदत केली तर काही नागरिकांनी नाग-नागीणची प्रणयक्रीडा पाहण्यासाठी गर्दी केली. नाग-नागीणची प्रणयक्रीडा सुरू असतानाच नागाने नागीणला गिळण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आश्‍चर्यचकीत झालेल्या नागरिकांनी हे दृष्य मोबाईलमध्ये टिपले. घटनेचा थरार याची डोळा अनुभवणारे छोटू वाघाळकर यांनी घडलेला प्रकार ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीकडे कथन केला. ते या घटनेच्यावेळी दोरवेकर यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. मनोहर दोरवेकर यांच्या मृत्यूमूळे एकीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत असून, दुसरीकडे नागाने नागीणला गिळल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.