शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय रुग्णालय आता रात्री ८ वाजतार्यंत राहणार उघडे !

By admin | Updated: February 19, 2016 01:46 IST

अकोल्याच्या स्नातकोत्तर पशुविज्ञान संस्थेचा उपक्रम राज्यात पहिला.

अकोला: शेतकरी, पशुपालकांकडील जनावरांना पशुवैद्यकीय सेवा सुलभ व तत्पर मिळावी, याकरिता अकोल्याच्या स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान संस्थेने रात्री ८ वाजतापर्यंत रुग्णसेवा सुरू केली आहे. जनावरांना अचानक होणारे आजार, अपघात यावर येथे तातडीने उपचार केले जात असून राज्यातील हा पहिला प्रयोग मानला जात आहे.महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठाची अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यकीय मत्स्य व विज्ञान संस्था आहे. या संस्थेत पशू, जनावरांच्या दुर्धर आजारांवर उपचार केले जातात. दुर्धर आजार व अवघड शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. सर्वच प्रकारच्या जनावरासंबंधी येथे संशोधनही केले जाते. या संस्थेने भाकड गायीमध्ये प्रजननक्षमता वाढविण्यासाठी ऋतूनियमाचे संशोधन केले असून, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाला हे संशोधन सुपूर्द केले. यासाठी पशुधन विकास मंडळाने या संस्थेला निधी उपलब्ध करू न दिला होता. जनावरांच्या आरोग्यावर होणारे खार्‍या पाण्याचे दीर्घ परिणाम यावरही या संस्थेत संशोधन करण्यात आले आहे. इतर शेतकर्‍यांच्या पशुधनासाठी पूरक कार्यक्रम येथे घेतले जात असून, पशुपालन कसे करावे याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात येत असते.दरम्यान, शेतकरी दिवसभर शेतात व्यस्त असल्याने ते जनावरांना रुग्णालयात आणू शकत नाही, अनेक वेळा अपघात व इतर आजारही जनावरांना होतात; पण रात्री रुग्णालयच उघडे राहत नसल्याने शेतकर्‍यांना त्यांच्याकडील जनावरांना खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञाला दाखवावे लागते. खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे शुल्क शेतकर्‍यांना परवडत नाही आणि वेळेवर तज्ज्ञ मिळेल याची शाश्‍वती नसते त्यामुळे जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान संस्थेने रुग्णालय रात्री ८ वाजतापर्यंत सुरू केले आहे. या रुग्णालयात अद्ययावत सर्व उपकरणे असून, जनावरांच्या प्रत्येक आजारावर येथे पशू रुग्णसेवा उपलब्ध आहे.