शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याच्या ‘ऑफलाइन’ अर्जांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:55 IST

अकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, गत ५ ऑगस्ट रोजी जिल्हय़ात ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील ६ हजार ७00 शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या ‘ऑफलाइन’ अर्जांची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील ६,७00 शेतकर्‍यांचे अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, गत ५ ऑगस्ट रोजी जिल्हय़ात ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील ६ हजार ७00 शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या ‘ऑफलाइन’ अर्जांची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत गत ४ ऑगस्टपर्यंत होती. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर शासन निर्णयानुसार गत ५ ऑगस्ट रोजी एक दिवस पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे ‘ऑफलाइन’ अर्ज जिल्हय़ातील सेतू केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील ६ हजार ७00 शेतकर्‍यांचे ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेले पीक विम्याचे ऑफलाइन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात संकलित करण्यात आले. पीक विम्यासाठी शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या  ऑफलाइन अर्जांच्या पडताळणीचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, नॅशनल इश्युरन्स कंपनी, कृषी विभाग अधिकार्‍यांच्या समितीमार्फत सुरू करण्यात आले आहे. 

‘या’ कागदपत्रांची केली जात आहे पडताळणी!पीक विमा काढण्यासाठी ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्‍यांनी अर्जासोबत जोडलेल्या सात-बारा, शेतीचे क्षेत्र, ३१ जुलैपूर्वीचा पीक पेरा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.