शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा

By atul.jaiswal | Updated: February 21, 2024 18:36 IST

पूर्व आकाशात शुक्र व मंगळ दर्शनाचा अमृत योग घडून येत आहे.

अकोला: आकाशात दरमहा प्रत्येक ग्रहाजवळ चंद्र आल्याने युती स्वरूपात ग्रह दर्शनाचा आनंद आपण घेत असतो, यापेक्षाही अधिक आनंद दोन ग्रह एकत्र बघताना होतो. अशाप्रकारे शुक्र आणि मंगळ ग्रह गुरुवार, २२ फेब्रुवारीला एकमेकांच्या अगदी जवळ येत असून, हा अनोखा नजारा पहाटे पूर्व क्षितिजावर नुसत्या डोळ्यांनी बघता येईल. चंद्र रोज बारा अंश सरकून एका दिवसात एक नक्षत्र आणि एका महिन्यात पूर्ण राशीचक्र फिरताना जेव्हा पुष्य नक्षत्रात येईल आणि जर त्या दिवशी गुरुवार असेल तर गुरुपुष्यामृत योग जुळतो.

याच दिवशी पूर्व आकाशात शुक्र व मंगळ दर्शनाचा अमृत योग घडून येत आहे. आपल्या पृथ्वीला सर्वांत जवळ असलेला आणि सूर्यमालेत सर्वात जास्त तेजस्वी असलेला शुक्र आणि सूर्यमालेत पृथ्वी नंतरचा लालसर रंगाचा मंगळ ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ बघता येतील. यावेळी या दोन्ही ग्रहांचे स्थान मकर राशीत बाराव्या अंशावर पहाटे ५:२१ वाजता उगवतील. दोन ग्रहांच्या एकत्रित आल्याने पूर्व क्षितिजावरील हा अनोखा आकाश नजारा सकाळी सहापर्यंत नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.

असे आहेत शुक्र, मंगळसूर्यमालेत सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेला शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वी यामध्ये असल्याने याचे उदयास्त पूर्व वा पश्चिम क्षितिजावर होत असतात. मंगळ ग्रहावर लोह खनिज अधिक प्रमाणात असल्याने त्याचा रंग लाल असून आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा सुमारे तीन पट उंच असलेले ऑलिंपस्मोन हे सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत शिखर आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोला