शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यापेक्षा जास्त झाली वाहन विक्री

By admin | Updated: April 1, 2017 03:06 IST

सवलतीच्या दराचा उचलला फायदा

अकोला, दि. ३१- न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. ही बंदी १ एप्रिलपासून लागू होत असल्याने शेवटच्या दिवशी जवळपास ६६0 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी पासिंगसाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विकल्या जाणार्‍या वाहनांपेक्षाही अधिक विक्री गेल्या दोन दिवसांत झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरुवारी रात्रीच अनेकांनी शोरूमकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहनांचे शोरूम सुरू होते. दोन दिवसांत विक्री झालेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक वाहने हे बीएस-३ दर्जाची आहेत. शुक्रवारी सकाळी वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पुन्हा शोरूमकडे धाव घेतली. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या मुहूर्तावर नसेल इतकी गर्दी सवलतीच्या दरातील वाहन खरेदीसाठी दिसून आली. अकोला शहरातील दुचाकी विक्रीच्या विविध शोरूममधून गुढीपाडव्याला २00 वाहने विकल्या गेली होती. गेल्या दोन दिवसांत तब्बल ५00 वाहने विकल्या गेल्याने मुहूर्ताचाही विक्रम मोडीत निघाला आहे. हेच वाहन घेऊन नोंदणीसाठी आरटीओ कार्यालय गाठण्यात आले. त्याकरिता सर्वच डीलरकडून आरटीओच्या कॅश काउंटरवर वाहनांची यादी व नोंदणी शुल्क जमा करण्यात आले. दुपारी २ वाजता बंद होणारे आरटीओचे कॅश काउंटर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. हीरोच्या १५0, होंडाच्या २२५ दुचाकी, टीव्हीएसच्या २३५, तर इतर कंपन्यांची ५0 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.