शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची आवक नाही!

By admin | Updated: June 3, 2017 01:37 IST

अकोल्याची स्थिती : ७० टक्के अडत दुकानदार फिरकले नाही बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव मिळावा म्हणून राज्यभरातील शेतकरी १ जूनपासून संपावर गेल्याने अकोल्यातील भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहे. जिल्ह्याशेजारील भाजीपाला आणि सांभार बाजारपेठेत न आल्याने शुक्रवारी सांभार कोथिंबिर दोनशे रुपये किलोच्या भावाने बाजारात विकला गेला. शुक्रवारी पहाटे जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला न आल्याने बाजारपेठेत त्याचा परिणाम जाणवला. शेतकऱ्यांचा माल बाजारात न आल्याने जनता भाजी बाजारातील ७० टक्के अडत दुकानदार शुक्रवारी बाजारात फिरकलेच नाही.गवार शेंगा, टमाटे, दुधी भोपळा, शिमला मिरची, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, बीट यांचे भाव ४० रुपये किलो झाले असून, २०० रुपये कि लोच्या दराने सांभाराची विक्री होत असल्याची माहिती भाजी विक्रेता नरेश लोणकर यांनी दिली. अकोल्यातील जनता भाजी बाजारात दररोज मध्यरात्री मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो; मात्र शेतकऱ्यांनी संप छेडल्याने गुरुवारच्या उत्तररात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत एकही गाडी माल घेऊन बाजारात आली नाही. मध्य प्रदेशातील भाजीपाला दररोज अकोल्यात येतो. गुरुवारी रात्री सांभार आणि पत्ताकोबीचा साठा अकोल्यात दाखल झाला; मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे रूप पाहून तेदेखील हादरले आहेत. शुक्रवारी रात्री भाजीपाला न पाठविण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अमरावती येथून पालक, मेथी आणि घोळची भाजी दररोज ४०७ आणि इतर गाड्यांतून येत असते; मात्र अकोल्यापेक्षा जास्त संपाची तीव्रता अमरावतीत असल्याने अमरावती मार्गे येणारा भाजीपाला शुक्रवारच्या पहाटे अकोल्यात पोहोचला नव्हता. त्यामुळे सांभारपाठोपाठ पालक, चवळी, मेथी आदी हिरव्या भाज्यांचे भाव वधारले आहेत. अकोल्याच्या जनता बाजारात भाजीपाल्याचे भाव वधारल्याने गाडी आणि ठेलेवाल्यांनीदेखील त्यापुढची झेप घेतली आहे. अकोल्याच्या बाजारपेठेत दररोज नाशिक, श्रीरामपूर, बुलडाणा, चिखली, पातूर, अकोट, वाडेगाव आदी परिसरातून कारले, वांगी, भेंडी, बरबटी आदी भाजीपाल्यांचा साठा येत असतो; मात्र शुक्रवारी पहाटेपर्यंत हा साठा न पोहोचल्याने ताज्या भाजीपाल्यांची कमतरता बाजारपेठेत जाणवली. ही तीव्रता आंदोलन काही दिवस सुरू राहिल्यास अधिक मोठ्या प्रमाणात जाणवण्याचे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांचा माल गुरुवारच्या मध्यरात्रीपासून येणार नाही, याची कल्पना आल्याने ७० टक्के अडत दुकानकारांनी शुक्रवारी जनता भाजीबाजारात पाऊलदेखील ठेवले नाही.-राजेश ढोमणे, अडत दुकानदार, अकोला.