शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील पांढरं सोनं भिजलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:41 IST

अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेलं पांढर (कापूस) सोनं भिजलं असून यामुळे  वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्‍चिम वर्‍हाडात झाले.

ठळक मुद्देपावसामुळे  नुकसान, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेलं पांढर (कापूस) सोनं भिजलं असून यामुळे  वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्‍चिम वर्‍हाडात झाले. पश्‍चिम विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र यावर्षी वाढले असून, ९२ टक्के क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. गतवर्षी ८ लाख ६१ हजार ३00 हेक्टर म्हणजे ७९ टक्केच पेरणी झाली होती. यावर्षी ९ लाख ९६ हजार १७ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्हय़ात ४ लाख ७0 हजार ३१५ हेक्टरवर म्हणजेच १0४ टक्के , अमरावती जिल्हय़ात २ लाख ७ हजार ४५७ हेक्टर, बुलडाणा १ लाख ७५ हजार 0५ हेक्टर, अकोला १ लाख १२ हजार ३१९ हेक्टर, तर वाशिम जिल्हय़ात ३0 हजार ९२१ हेक्टरवर   पेरणी झाली आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. त्यानंतर पावसाचा खंड पडला पण, असे असतानाही कपाशीचे पीक जोरदार आले आहे. दसर्‍याला विदर्भात ‘सीतादही’ म्हणजेच कापसाच्या शेतात पूजा करू न वेचणी केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व कापूस वेचणीला आला आहे. खरीप हंगामातील ज्या शेतकर्‍यांनी जूनमध्ये पेरणी केली, तेथेही कापूस वेचणीला आला आहे. पण गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेल्या या पांढर्‍या सोन्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासर्व पिकांची कसर कापूस पीक भरू न काढेल, अशी अपेक्षा होती; पण आज आलेला पाऊस तोंडचा घास हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकर्‍यांनी कापूस वेचून घ्यावा, ओट्यावर टाकून ताडपत्रीने झाकून घ्यावे, झाडं मोठी असतील तसेच पर्‍हाटीच्या फांद्या जमिनीवर लोळत असतील, तर त्यासाठीची उपाययोजना करू न झाडांना उंच बांधण्याची सोय करावी, शेतात पाणी साचले असल्यास चर काढून पाणी बाहेर काढावे. - डॉ. व्ही.एम.भाले,कूलगुरू,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.