शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

वनउपज तपासणी नाके गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:15 IST

अकोला : प्रादेशिक वन विभागाच्या जंगलातून झाडांची अवैध  कत्तल करणे आणि या लाकडांची छुप्या मार्गाने वाहतूक  करणार्‍यांची तपासणी करण्यासाठी वन विभागाचे वनउपज त पासणी नाके शहरासह काही ठिकाणी अस्तित्वात होते; मात्र सद्य  स्थितीत हे चेक नाके गायब असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या  स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे.

ठळक मुद्देवाशिम बायपाससह अनेक ठिकाणी होते ‘चेक नाके’ स्टिंग ऑपरेशन

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रादेशिक वन विभागाच्या जंगलातून झाडांची अवैध  कत्तल करणे आणि या लाकडांची छुप्या मार्गाने वाहतूक  करणार्‍यांची तपासणी करण्यासाठी वन विभागाचे वनउपज त पासणी नाके शहरासह काही ठिकाणी अस्तित्वात होते; मात्र सद्य  स्थितीत हे चेक नाके गायब असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या  स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग व शहरात येणार्‍या मार्गाने लाकडांची अवैधरी त्या वाहतूक करण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अवैध वृक्षतोड  आणि बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी वन विभागाद्वारे शहराच्या  चारही बाजूने येणार्‍या मुख्य मार्गावर तसेच जंगलातील काही  महत्त्वाच्या ठिकाणांवर वनउपज तपासणी नाके कार्यान्वित  करण्यात आले होते. शहरातील वाशिम बायपास, खडकीकडून  येणार्‍या मार्गावर वाहनांची तपासणी करणे तसेच लाकडांची  वाहतूक करणार्‍या वाहनांना एका वन विभागाकडून राबविण्यात  येत असलेल्या एका तपासणीच्या प्रक्रियेतून जावे जागत होते;  मात्र गत पाच वर्षांपासून वन विभागाचे हे चेक नाके गायब झाले  आहेत. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा  केली असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग गावाच्या बाहेरून गेल्यामुळे  हे तपासणी नाके त्यावेळी गावाबाहेर हलविल्याचे सांगितले;  मात्र शहराच्या बाहेरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वन  विभागाचा एकही चेक नाका नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने  केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. वन विभागाचे  वनउपज तपासणी नाके गत अनेक वर्षांपासून कार्यान्वित  नसल्याने लाकडांची अवैधरीत्या होणारी वाहतूक मोठय़ा  प्रमाणात वाढल्याची माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत  समोर आली आहे. काटेपूर्णा अभयारण्य, पातुराला लागून  असलेले जंगल तसेच अकोट तालुक्यातील मेळघाट परिसरा तील जंगलातून अवैध वृक्ष कत्तल आणि वाहतूक करण्यात येत  असेल, तर त्याची तपासणीच होत नसल्याचीही माहिती समोर  आली आहे. अकोट तालुक्यातील खटकाली परिसरात एक  वनउपज चेक नाका आहे; मात्र हा नाका वगळता शहरातील  नाके अचानकच गायब झाल्याचे वन तस्करांचे चांगलेच फावले  आहे.

खटकालीमध्ये तपासणीमेळघाट जंगलातून येणार्‍या खटकाली येथील वनउपज त पासण्यासाठी तत्पर असा चेक नाका आहे. या चेक नाक्यावर  वाहनांची तपासणी करण्यात येते; मात्र काटेपूर्णा व पातूरच्या  जंगलातून येणार्‍या वाहनांची तपासणी होत नसल्याची माहिती  ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

पाच वर्षांपासून नाके नाहीत!पातूर रोडवर असलेला मुख्य चेक नाका गत पाच वर्षांपासून  गायब आहे, हा नाका पातूर येथे हलविल्याचे सांगण्यात येते  तसेच राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेर गेल्याने हा नाका राष्ट्रीय  महामार्गावर असल्याचे सांगण्यात आले; मात्र सदर ठिकाणी हा  चेक नाकाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.