शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वानचे पाणी पेटले; अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:15 IST

बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

अकोट/तेल्हारा: अकोट मतदार संघातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या धरणाचे पाणी अकोला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना करीता देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी करतात १० सप्टेंबर रोजी अकोट मतदारसंघ बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. अकोट व तेल्हारा तालुका व शहरांमध्ये उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात येत आहे.

अकोला बुलढाणा अमरावती सीमेवर वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाणी अकोला करीता शासनाने आरक्षित केल्यामुळे तालुक्यात सिचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला तो निर्णय रद्द करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर सर्वपक्षीय मतदारसंघ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. बंदमध्ये अकोट शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवली होती या बंदमधून आरोग्य सेवा वगळण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक सुरू होती. बंद दरम्यान विविध पक्षाच्या व संघटनेच्या पदाधिकाºयांनी शहरात फिरून व्यापारी वर्गाच्या आभार मानले. हा बंद शांततेत पार पडला. बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधव व विविध राजकिय पक्षाचे ,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले.

तेल्हारा तालुका व शहरातही उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.

टॅग्स :akotअकोटTelharaतेल्हाराAkolaअकोला