शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना ‘वंदेमातरम्’ स्वर श्रद्धांजली शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 13:30 IST

अकोला: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवार, १५ मार्च रोजी स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंदेमातरम् स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवार, १५ मार्च रोजी स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंदेमातरम् स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती यावेळी प्रदीप गुरुखुद्दे यांनी दिली.वंदेमातरम् स्वरांजली कार्यक्रमासंदर्भात शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. मुकुंद जालनेकर, संजीव देशमुख, आरती टाकळकर यांची उपस्थिती होती. जिल्हा मुद्रक संघ व अकोला आर्ट सोसायटी आणि प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शुक्रवार, १५ मार्च रोजी शहिदांना स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रदीप देशमुख, राम भारती, स्मिता डवले, आनंद जहागीरदार, नंदकिशोर दाभाडे, श्याम कपले, नंदकिशोर पाटील, हर्षवर्धन फुलझेले, वर्षा कडोळे आदी स्थानिक कलावंत आपल्या सुमधुर स्वरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क खुला राहणार आहे. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड आणि मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत यांच्या कुटुंबीयांना भविष्यनिर्वाह देण्याचा प्रयत्न असल्याचा यावेळी त्यांनी सांगितले. या मदतीसाठी ज्या नागरिकांना सहकार्य करायचे असेल, त्यांनी कार्यक्रमादरम्यान मदत निधी द्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMartyrशहीद