शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे होणार निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:47 IST

अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याकरिता व त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने बुधवार, २ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अकोला मंडळातील सर्वच तालुक्यांतील उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये अकोला शहरातील ग्राहकांकरिता विद्युत भवन येथील ग्राहक सुविधा केंद्र येथे, ...

ठळक मुद्देमहावितरणचा ग्राहकांशी सुसंवाद सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये विशेष शिबिराचे आयोजन

अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याकरिता व त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने बुधवार, २ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अकोला मंडळातील सर्वच तालुक्यांतील उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये अकोला शहरातील ग्राहकांकरिता विद्युत भवन येथील ग्राहक सुविधा केंद्र येथे, अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, अकोट येथील उपविभागीय कार्यालय परिसरात तर तेल्हारा उपविभागातील ग्राहकांकरिता हिवरखेड शाखा कार्यालय येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वीज बिल दुरुस्ती, घरगुती व इतर वर्गवारींची नवीन वीज जोडणी, वाढीव भार, नावामधील बदल-दुरुस्ती, मोबाइल क्र. नोंदणी तसेच इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन ग्राहकांना देण्याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथे ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून, ग्राहकांनी त्यांच्या तक्रारीसंदर्भातील कागदपत्रे व वीज देयके सोबत आणावीत. शिबिराच्या दिवशी संबंधित कामाकरिता विभागातील व उपविभागातील संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून यासंदर्भात मार्गदर्शन करतील. ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अकोला मंडळाकडून करण्यात आले आहे.