शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील लाखो जनावरांना रोग प्रतिबंधक लस

By admin | Updated: June 28, 2016 20:32 IST

पशुसंवर्धन विभागाची मोहीम; पावसाळ्यापूर्वी लसीकरणावर भर.

ब्रह्मनंद जाधव/बुलडाणा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनांचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पश्‍चिम विदर्भातील लहान व मोठय़ा अशा १ लाख ७0 हजार ३९१ जनावरांना विविध रोगांपासून संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक लस देण्यात आली. पावसाळ्यात होणार्‍या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे या जनावरांचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे. पावसाळ्यापूर्वी या मोहिमेत अमरावती विभागातील १ लाख ७0 हजार ३९१ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, बैल आदींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७ हजार ९४0 लहान, मोठय़ा जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात २ हजार २७३, वाशिम जिल्ह्यात २८ हजार २३२, बुलडाणा जिल्ह्यात ९७ हजार ५१५ व यवतमाळ जिल्ह्यात ३४ हजार ४३१ पशूंचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकर्‍यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून विभागातील पाच जिल्ह्यात लाखो जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. *या रोगांवर झाले लसीकरणपशुसंवर्धन विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फर्‍या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. *१ लाख ११ हजार गायी, म्हशींचा समावेशअमरावती विभागातील १ लाख ११ हजार २२४ गायी व म्हशींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १ हजार ९४0, वाशिम जिल्ह्यात २७ हजार ३१३, बुलडाणा जिल्ह्यात ६४ हजार १४६ व यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार ८२५ गायी व म्हशींचे लसीकरण करण्यात आले आहे. अमरावती विभागात झालेले लसीकरण.............................जिल्हा                जनावरांची संख्या............................अमरावती              ७९४0अकोला                 २२७३वाशिम                २८२३२बुलडाणा              ९७५१५यवतमाळ             ३४४३१..............................एकूण                १७0३९१..............................