शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी लवकरच लसीकरण -  डॉ.कि.मा. ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:31 IST

आजाराने गुरांच्या मृत्यूची संख्या फारच कमी असल्याने पशुपालकांनी घाबरू नये आवाहन  जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.कि.मा ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना केले. 

 - संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजिल्ह्यात सध्या गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण होत आहे. तीन तालुक्यांमध्ये अनेक गुरे या आजाराने त्रस्त असून हळूहळू जिल्ह्यात पसरत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा आजार काळजी घेल्यास दूर होऊ शकतो. पशुपालकांनी गुरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, तसेच या आजाराने गुरांच्या मृत्यूची संख्या फारच कमी असल्याने पशुपालकांनी घाबरू नये आवाहन  जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.कि.मा ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना केले. 

लम्पी स्किन आजार काय आहे? लम्पी हा विषाणूजन्य साथीचा चर्मरोग आहे.हा रोग मुख्यत्व गायींमध्ये आढळतो. म्हशीवर क्वचीतच आढळतो. तसेच शेळी, मेंढींना हा आजार होत नाही. संकरीत आणि विदेशी गायींमध्ये या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. लहान वासरांसाठी हा रोग धोकादायक ठरू शकतो. या रोगाचा प्रसार उष्ण व दमट हवामानात जास्त होतो. पावसाळ्यात आजार पसरण्याची भिती अधिक आहे. हिवाळ््यात या आजाराचा प्रसार कमी होतो. 

लम्पी स्किन डिसीज आजार कशामुळे होतो?लम्पी स्किन डिसीज हा आजार मुख्यत्वे किटकांमुळे होतो. चावणाºया माशा, डास, गोचीड,  निरोगी गुरे बाधीत गुरांच्या संपर्कात आल्याने, दुषीत चारा व पाणी आदींमुळे हा आजार होतो. या आजारात गुरे अशक्त होतात.दुध उत्पादनात घट होते, गर्भपात, प्रजनन क्षमतेत घट, त्वचा खराब व विकृत होते.  या आजाराने मृत्यूचे प्रमाण १ ते ५ टक्के आहे. जिल्ह्यात अजुनपर्यंत एकाही गुराचा मृत्यू झालेला नाही.   

या आजाराची लक्षणे काय आहेत? लम्पी स्किन डिसेज आजाराची लागण झाल्यास गुरांना सुरूवातीस भरपूर ताप येतो. डोळ््यातून व नाकातून स्त्राव येतो. गुरे चारा खाने व पाणी पिणे बंद करतात.  दृष्टी बाधीत होते. त्वचेवर गाठी येतात. डोके, मान, पाय, कास भागात १० ते १५ मिमी व्यासाच्या गाठी येतात. 

लम्पी स्किन आजारावर उपाय योजना काय ?आपल्या जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. आजाराची लक्षणे दिसताच उपचार सुरू करण्यात येतात. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक बाधीत गुरे उपचाराने बरी झाली आहेत. पशुपालकांनी बाधीत गुरांना निरोगी गुरांपासून दूर ठेवावे. तसेच गुरांचे गोठे स्वच्छ ठेवल्यास या आजारापासून गुरांना दूर ठेवता येउ शकते.राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातून हा रोग आपल्याकडे आला आहे. गुरांच्या बाजारातून संक्रमण वाढले आहे. त्यामुळे, काही दिवस गुरांचे बाजार बंद ठेवावे. लम्पी स्किन आजाराची लागण होउ नये यासाठी लवकरच लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 

 जिल्ह्यात पशु वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे भार वाढलेला आहे. तरीही लवकरच तीन लाख रुपयांच्या लसी विकत घेउन गुरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लम्पी स्किन आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनासह पशुपालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत