शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:39 IST

अकोला: जिल्ह्यातील कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त असून, यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह इतर प्रमुख पदे खाली आहेत.

अकोला: जिल्ह्यातील कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त असून, यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह इतर प्रमुख पदे खाली आहेत. विशेष म्हणजे, लेखा अधिकाऱ्यांचे पदही रिक्त असल्याने शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया अनेक योजनांचा पैसा परत जाण्याच्या मार्गावर आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा, दोन जिल्हा उपसंचालक आत्मा, चार सहायक अधीक्षक, लेखाधिकाºयांचे महत्त्वाचे पद रिक्त आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र एक प्रशासकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे. बाळापूर तालुका कृषी अधिकाºयाचे पद तर सात-आठ वर्षांपासून रिक्त आहे, तसेच दोन मंडळ अधिकारीही नाहीत. अकोट तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाºयाचे पद रिक्त आहे. येथीलच कार्यालयीन कृषी अधिकारीच नाही. अकोला तालुक्यात दोन मंडळ कृषी अधिकारी, तेल्हारा तालुक्यातील एक मंडळ अधिकाºयाचे पद रिक्त आहे, तसेच पातूर दोन, मूर्तिजापूर दोन, येथेच एक आत्मा तंत्र पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे. याशिवाय २५ च्यावर कृषी सहायक, १० कृषी पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. अकोल्यात लेखाधिकाºयांचे महत्त्वाचे पद रिक्त आहे. आतापर्यंत कंत्राटी लेखाधिकाºयांनी काम बघितले. लेखाधिकारी नसल्याने अनेक योजनांचा पैसा काढणे व त्याचा हिशेब ठेवणे कठीण झाले आहे.अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधी व अनेक योजना शेतकºयांसाठी राबविण्यात येत आहेत. तथापि, जिल्ह्यातील कृषी विभागाची मुख्य पदेच रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली; पण त्यांच्या जागा अद्याप भरलेल्या नाहीत. ज्यांची येथे बदली करण्यात आली, ते अजून रुजू झाले नाहीत. आत्माचे संचालक, उपसंचालक नाहीत. यांतर्गत जिल्ह्यात शेकडो शेतकरी बचत गट, शेतकरी कंपन्या नोंदणी झाली आहे. कंपन्या, गटाच्या शेतकरी संचालकांना अनेक तांत्रिक बाबींची माहितीची गरज असते. तथापि, त्यांना माहिती देणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बाळापूर तालुक्याला कायमस्वरू पी तालुका कृषी अधिकारी नाही. अनेक ठिकाणी प्रभारीवर काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त ठेवून जिल्हा व जिल्ह्यातील शेतकरी वाºयावर सोडण्यामागचे कारण काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

- जिल्ह्यात पदे रिक्त आहेत. अकोला तालुक्यातही सहा कृषी सहायक, तीन पर्यवेक्षक, दोन मंडळ अधिकारी नाहीत. असे असले तरी काम करावेच लागणार आहे. ते आम्ही जोरात करीत आहोत.नरेंद्र शास्त्री,कृषी अधिकारी,अकोला.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र