शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकांचा केवळ वापर वाढला, प्रत्यक्षात तणनियंत्रण कमी!

By admin | Updated: July 4, 2014 00:43 IST

रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे.

अकोला: कीडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. गतवर्षी ९२ टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकासाठी तणनाशकांचा वापर केला; परंतु तणनाशकांची नेमकी मात्रा न दिल्याने ८६ टक्के शेतकर्‍यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे. तणांमुळे पिकांचे होणारे नुकसान, मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. त्यासाठी या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशके वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्‍यांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या २४0 शेतकर्‍यांपैकी गतवर्षी २२१ (९२ टक्के ) शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांचा वापर केल्याचे आढळून आले. आठ वर्षांपूर्वी केवळ ५ टक्के शेतकरी तणनाशकांचा वापर करीत होते. ४२ टक्के शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय नसल्याचे या अभ्यासात आढळून आले असून, ७ टक्के शेतकर्‍यांना हेक्टरी २१ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन झाल्याचे समजले. २२ टक्के शेतकर्‍यांनी पीक कर्ज घेतले नव्हते. ४२ टक्के शेतकर्‍यांनी फवारणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. ४0 टक्के शेतकर्‍यांकडे बैलजोडी नव्हती, १७ टक्के शेतकर्‍यांकडे स्वत:चे ट्रॅक्टर होते. गतवर्षी प्रथमच १४ टक्के शेतकर्‍यांनी तणनाशकाचा वापर केला. ९0 टक्के शेतकर्‍यांनी तणनाशक तंत्रज्ञान पिकांसाठी वरदान असल्याची भूमिका मांडली. तणनाशक कसे वापरावे, मात्रा किती असावी, याबाबत शेतकर्‍यांमध्ये ज्ञानाचा अभाव जाणून आला.