शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मतदान नोंदविण्यासाठी जांभळ्या ‘स्केच पेन’चा वापर

By admin | Updated: January 31, 2017 02:25 IST

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; जिल्हाधिका-यांची माहिती.

अकोला, दि. ३0- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत मतपत्रिकेवर पसंतीक्रमाचे मत नोंदविण्यासाठी मतदान कर्मचार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या जांभळय़ा शाईच्या स्केचपेनचाच मतदारांना वापर करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिली.अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर बाश्रीटाकळी, पातूर, मूर्तिजापूर व तेल्हारा या सातही तालुक्यात ६६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदानासाठी जिल्हय़ातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकार्‍यांच्या पथकांसह चतुर्थश्रेणी कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक आणि पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान नोंदविण्यासाठी कोणत्याही पेन, पेन्सील, किंवा बॉलपेनचा वापर करता येणार नाही, तर मतदान केंद्रांवर मतदान कर्मचार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या जांभळ्या शाईच्या स्केचपेनचाच वापर करावा लागणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. मतदानात मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवारांच्या नावापुढे ह्य१ह्ण हा क्रमांक नोंदविणे आवश्यक असून, इतर प्राधान्य क्रम देणे ऐच्छिक राहणार आहे.उमेदवाराच्या नावापुढे एकापेक्षा जास्त प्राधान्यक्रम नोंदविल्यास मतपत्रिका बाद होणार आहे. प्राधान्य क्रमाचे अंक भारतीय अंक पद्धतीनुसार इंग्रजी, रोमण किंवा मराठी अंकाप्रमाणे नोंदविता येतील. ह्य१ह्णचा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नोंदविल्यास मतपत्रिका बाद होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गजानन सुरंजे उपस्थित होते.मतदार कर्मचार्‍यांना नैमित्तिक रजा मंजूर !पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारसंघातील कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. तसेच जिल्हय़ातील औद्योगिक संस्था, कारखाने, खासगी कार्यालये इत्यादी संस्थांच्या आस्थापनेवरील पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार तीन तास कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.