शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकार्‍यांवर दबाव तंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:09 IST

अकोला : अवघ्या सात दिवसांपूर्वी पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळणार्‍या महापालिकेच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांना सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या मानापमान नाट्याला सामोरे जाण्याची वेळ आली.

ठळक मुद्देमानापमानाचा मुद्दापूर्व झोनमधील भाजप नगरसेवक आले एकत्र

अकोला : अवघ्या सात दिवसांपूर्वी पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळणार्‍या महापालिकेच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांना सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या मानापमान नाट्याला सामोरे जाण्याची वेळ आली. या विषयावर सबुरीने न घेता पूर्व झोनमधील भाजप नगरसेवकांनी एकत्र येत डॉ.भोसले यांना महापौरांच्या कक्षात पाचारण केले. नगरसेवकांनी एकत्र येऊन अधिकार्‍यांवर आगपाखड केल्याचा प्रकार ध्यानात घेता पूर्व झोनची सूत्रे पुन्हा नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेत सहायक आयुक्त पदावर परिविक्षाधीन कालावधीसाठी दीड वर्षांपूर्वी जीतकुमार शेजव, डॉ.दीपाली भोसले यांची नियुक्ती झाली. पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदावर कार्यरत अनिल बिडवे यांच्याकडे नगर सचिव पदाचा अतिरिक्त पदभार होता. दोन्ही पदभार सांभाळताना बिडवे यांची तारांबळ उडत असल्याचे पाहून प्रशासनाने सहायक आयुक्त डॉ.दीपाली भोसले यांच्याकडे पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली. तसेच सहायक आयुक्त जीतकुमार शेजव यांच्याकडे पश्‍चिम झोनची जबाबदारी दिली. डॉ.भोसले यांनी २३ ऑक्टोबर क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच उण्यापुर्‍या सात दिवसांच्या आत त्यांना नगरसेवकांच्या मानापमान प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली. महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल यांनी त्यांच्या प्रभागातील देशमुख नामक इसमाकडून अनधिकृत बांधकाम होत असल्याची सूचना केली असता या मुद्यावरून रामायण घडल्याची माहिती आहे. डॉ.भोसले नगरसेविकांचे भ्रमणध्वनी घेत नसल्याचा गैरसमज होऊन खदखद बाहेर आली. अवघ्या सात दिवसांपूर्वी पूर्व झोनचा पदभार स्वीकारणार्‍या डॉ.दीपाली भोसले यांच्या संदर्भात पूर्व झोनमधील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी केलेली एकी पाहता शंकाकुशकांना ऊत आला आहे. नवख्या अधिकार्‍यांवर जाणीवपूर्वक दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. 

महापौरांच्या दालनात माफीनामा नाट्य!महापौर विजय अग्रवाल यांचा राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या असलेला अनुभव पाहता त्यांनी नगरसेवक व अधिकार्‍यांमधील नाराजीवर समन्वयातून तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यांच्या दालनात एकत्रित आलेले नगरसेवक व अधिकार्‍यांमध्ये रंगलेल्या माफीनामा नाट्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. -

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका