शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फळ रोपं जगविण्यासाठी पीडीकेव्ही मटका सिंचन मॉडेलचा वापर!

By admin | Updated: April 16, 2016 02:07 IST

कृषी विद्यापीठातील फळझाडांना मटक्याचा आधार.

राजरत्न सिरसाट/अकोलाविदर्भातील पाणीटंचाई आणि तापमानाचा वाढता पारा बघता शेतकर्‍यांना नवीन फळझाडे जगविण्यासाठी प्रयत्न करावे लागत असून, फळझाडं जगविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या पीकेव्ही मटका सिंचन मॉडेलचा आधार वाटत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या पद्धतीने पाणी देऊन फळझाडे जगविण्यात येत आहेत. या मॉडेलला राज्यस्तरीय संशोधन सल्लागार संशोधन आढावा समितीने मान्यता दिली आहे.विदर्भात मुख्यत्वे अकोला जिल्हय़ात तापमान प्रचंड वाढले असून, पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पिण्यासाठीच पाणी नसल्याने फळझाडांना पाणी देणार कोठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासह शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. दोन वर्षाआतील फ ळझाडांना नियमित पाणीपुरवठय़ाची गरज असल्याने कृषी विद्यापीठाने या मॉडेलचा वापर करू न फळझाडे जगविण्यात यश प्राप्त केले आहे. या मॉडेचा वापर केल्यास ठिबक सिंचनापेक्षाही उपयुक्त आहे. जांभूळ, सीताफळ, करवंद आदी झाडांना या मटका सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आठ दिवसातून एकदाच पाच लीटर पाणी लागते. बहूद्देशीय फळझाडांना मात्र पंधरा दिवसातून एकदा मटके भरावे लागते. नवीन झाडांना खंड नको असल्याने काळजी घ्यावी लागते, तीच काळजी विदर्भातील शेतकर्‍यांना घ्यावी लागत आहे. संत्रा झाडांना आठवड्यातून दोनदा पाणी द्यावे.मटका सिंचन पद्धतपाच लीटर पाणी सामावेल असे मटके घेऊन त्या मटक्याच्या आत, बाहेर पांढरा चुना लावावा लागतो. मटक्यांच्या बुडाला ड्रीलने लहानसे छिद्र पाडावे. या छिद्रातून चिंधी आतल्या बाजूने ओढावी. हे मटके झाडांच्या १५ से.मी. अंतरावर आळा करू न जमिनीत गाडावे लागते. मटक्याचे तोंड केवळ वर असावे. तत्पूर्वी त्याखाली गवताचे आच्छादन करावे. या प्रयोगामुळे ठिबक संचापेक्षाही उत्तमरीत्या झाडांना पाणी मिळून झाडांचे या प्रखर उन्हाळ्य़ात संगोपन केले जाते.