शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बिट निरीक्षकांचा प्रयोग फसला

By admin | Updated: December 28, 2014 00:58 IST

अकोला मनपातील कामांचे मूल्यमापनच नाही!

अकोला : शहरातील अनधिकृत बांधकामे, ठिकठिकाणी होणारे अतिक्रमण आदी प्रकाराला चाप लावण्यासाठी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रभागनिहाय बिट निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा धाडसी निर्णय मे महिन्यात घेतला होता. याकरिता झोननिहाय एकूण ७३ कर्मचार्‍यांची बिट निरीक्षक म्हणून नियुक्तीही करण्यात आली. सद्य:स्थितीत शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणाचे चित्र लक्षात घेता, बिट निरीक्षकांचा प्रयोग पूर्णत: फसला असून, संबंधित कर्मचार्‍यांनी दैनंदिन कामकाजाचा अहवालच सादर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. शहरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम, फेरीवाल्यांसह लघु व्यावसायिकांच्या अतिक्रमणात वाढ झाली. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरून पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे. ऐन रस्त्यालगत दुकाने थाटली जात असल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शिवाय नगर रचना विभागाच्या नियमांना ठेंगा दाखवत अनधिकृत बांधकामाची मालिका सुरूच आहे. या सर्व परिस्थितीला आळा घालण्यासाठी फुटकळ उपाय केल्यापेक्षा ठोस व प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्याची गरज होती. त्यानुषंगाने आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मनपाच्या इतिहासात प्रथमच प्रभागनिहाय बिट निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. बिट निरीक्षकांनी संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांना प्रभागातील इमारतींचे बांधकाम, फेरीवाल्यांसह लघु व्यावसायिकांनी थाटलेल्या अतिक्रमणाची इत्थंभूत कागदोपत्री माहिती सादर करणे बंधनकारक होते. शिवाय, अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी नियमित गस्त घालण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. प्रभागात बांधकाम करणार्‍या व्यावसायिकाचे नाव, पत्ता, बांधकामाचे वर्णन, मालकी हक्क आदी कागदपत्रांची तपासणी करण्याचा अधिकार बिट निरीक्षकांना देण्यात आले होते.