शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:00 IST

अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा प्रशासनाने भूखंडाचे उपविभाजन न करताच मालमत्ताधारकाला इमारतीच्या बांधकामाची परवानगी बहाल केली. याविरोधात दाद मागणाऱ्या तक्रारकर्त्याने आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी यांच्यासह महापालिका प्रशासनाचे उंबरठे झिजवले. तरीही अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता रामदासपेठ भागातील सर्वसामान्य तक्रारकर्त्याला न्याय मिळेल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.रामदासपेठ परिसरातील गड्डम प्लॉटस्थित मंगल कार्यालयाच्या बाजूला प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी नझूल शीट क्रमांक ६२ भूखंड क्रमांक ९/४७ या जागेवर मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार गिरीराज यशवंत राव, गौरीशंकर कलशेट्टी व अ‍ॅड. आनंद कलशेट्टी यांनी मनपा प्रशासनाकडे केली. एकाच भूखंडावर दोन वेगवेगळ्या मालमत्ताधारकांना बांधकाम करावयाचे असल्यास भूखंडाचे उपविभाजन करणे अत्यंत गरजेचे आहे. भूखंडाचे उपविभाजन मंजूर नसतानाही प्रवीणचंद्र त्रिवेदी यांनी बांधकामाला सुरुवात केल्याची बाब पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यावरून क्षेत्रीय अधिकारी जाधव यांनी प्रवीणचंद्र त्रिवेदी यांना नोटीस बजावली आहे. तसेच नकाशाव्यतिरिक्त समोरील समास अंतरामध्ये जिन्याचे बांधकाम केले असून, ते तातडीने हटविण्याचे निर्देश दिले.अन्यथा मनपाच्या स्तरावर कारवाई करण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला. महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही मालमत्ताधारक त्रिवेदी यांच्याकडून बांधकाम सुरूच असल्याची तक्रार गौरीशंकर कलशेट्टी यांनी प्रशासनाकडे केली आहे. तरीही बांधकाम बंद होत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधींनी निर्देश दिल्यावरही कारवाई नाहीच!भूखंडाचे नियमानुसार उपविभाजन न करताच नियमापेक्षा जास्त बांधकाम केले जात असल्याप्रकरणी तक्रारकर्ते गौरीशंकर कलशेट्टी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यावर संबंधित लोकप्रतिनिधीने मनपातील सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात अवगत केले. लोकप्रतिनिधींनी निर्देश दिल्यावरही अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही, हे येथे उल्लेखनीय.

नगररचना विभागाला इमारतीच्या मोजमापाचे निर्देश देत बांधकामकर्त्याला नोटीस दिली होती. त्यानंतरही बांधकाम सुरू असेल तर कारवाई केली जाईल.- दिलीप जाधव,क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झोन

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका