शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू माध्यमाचे नऊ शिक्षक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:32 IST

अकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता नियुक्ती  मिळालेल्या उर्दू माध्यमातील दहापैकी नऊ शिक्षकांना सेवेतून  बडतर्फ करण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती यांची सोमवारी स्वाक्षरी झाली. उद्या मंगळवारी  कॅव्हेटची तयारी झाल्यानंतर दोन्ही माध्यमांच्या मिळून ३२  शिक्षकांवर कारवाईचा आदेश बजावला जाणार आहे. 

ठळक मुद्देएकाची चौकशीमराठी, उर्दूचे मिळून ३२ शिक्षकांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता नियुक्ती  मिळालेल्या उर्दू माध्यमातील दहापैकी नऊ शिक्षकांना सेवेतून  बडतर्फ करण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती यांची सोमवारी स्वाक्षरी झाली. उद्या मंगळवारी  कॅव्हेटची तयारी झाल्यानंतर दोन्ही माध्यमांच्या मिळून ३२  शिक्षकांवर कारवाईचा आदेश बजावला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आस्थापनेची  संवर्गनिहाय बिंदूनामावली २00७ मध्ये तयार करण्यात आली.  त्या बिंदूनामावलीत प्रचंड गोंधळ करण्यात आला. त्यावर  विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाने अनेक  आक्षेप नोंदविले. त्यामुळे ही बिंदूनामावली अद्यापही अंतिम  झाली नाही. ती अंतिम करण्यासाठी आधी चुकीच्या पद्धतीने  देण्यात आलेल्या नियुक्त्या, आंतरजिल्हा बदलीने दिलेल्या  पदस्थापनेमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी  कारवाईचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सादर  केला. त्यामध्ये एसटीच्या पदावर गैरआदिवासी कर्मचार्‍यांची  नियुक्ती, ज्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचार्‍यांनी जात वैधता  सादर केली नाही, १५ जून १९९५ नंतर विशेष मागास प्रवर्गातील  उमेदवारांना एसटी प्रवर्गात नियुक्तीची प्रकरणे आहेत. विशेष  म्हणजे, ८ जुलै २0११ रोजी विधिमंडळाच्या विमुक्त जाती,  भटक्या जमाती कल्याण समितीने या गंभीर प्रकाराची दखल घेत  कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार आधी मराठी माध्यमांच्या ४४  पैकी २३ शिक्षकांच्या बडतर्फीचा आदेश देण्यात आला. १२  शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवले जाणार आहे, तर  नऊ शिक्षकांची प्रकरणे न्यायालयात असल्याने त्यांचा निर्णय  प्रलंबित आहे. त्याचवेळी उर्दू माध्यमांच्या दहा शिक्षकांवर  कारवाईचा प्रस्तावही प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर  यांनी सादर केला होता. त्यावर गेल्या आठवड्यात स्वाक्षरी न  झाल्याने कारवाईचे घोडे अडलेले होते. सोमवारी सकाळीच मु ख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नऊ शिक्षकांच्या बडतर्फीच्या  आदेशावर स्वाक्षरी केली, तर एका शिक्षकाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचा  आदेश देण्यात आला. उद्या मंगळवारी कॅव्हेट दाखल करणे,  अंतिम बिंदूनामावली विभागीय आयुक्तांना सादर केल्यानंतर  शिक्षकांच्या बडतर्फीच्या आदेशाची अंमलबजावणी होणार  आहे.