शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सेवानवृत्त अधिसेविकेकडे कोटींची अपसंपदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:42 IST

अकोला : सार्वजनिक आरोग्य खात्यामधून  सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका  अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल  पावनेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता  बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा खळबळजनक  प्रकार बुधवारी समोर     आला. 

ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त अधिसेविका ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावनेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दाखल केला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक आरोग्य खात्यामधून  सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका  अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल  पावनेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता  बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा खळबळजनक  प्रकार बुधवारी समोर आला. सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये वर्ग ३ कर्मचारी  असलेली अधिसेविका मीना मनोहर माहुरे हिने तिच्या  सेवाकाळातील १ जानेवारी २00२ ते ३0 जून २0१३  या ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ७0 ला ख 0५ हजार ७१८ रुपयांची अपसंपदा गोळा केली.   ही अपसंपदा मिळकतीपेक्षा ४२0.७७ टक्के एवढी  अधिक आहे.  या प्रकरणाची तक्रार अकोला  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे झाल्यानंतर,  लाचलुचपत प्रतिबंधक  खात्याचे प्रमुख संजय गोर्ले  यांनी सखोल चौकशी करून गीतानगर येथील  रहिवासी सेवानवृत्त अधिसेविका मीना मनोहर माहुरे  (वय ६१), तिचा पती व्यवसायाने शेती करीत  असलेला मनोहर रामभाऊ माहुरे (वय ६५) व मुलगा   स्वप्निल मनोहर माहुरे (वय २८) या तिघांविरुध्द  बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बुधवारी  अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दा खल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक  खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक ईश्‍वर चव्हाण, सुधाकर गाडगे,  पंचबुद्धे, काळे, उंबरकर, सुनील राऊत, ज्ञानेश्‍वर  सैरीसे, दहीहांडे, गावंडे, खडसे व कश्यप यांनी केली.स्थावर मालमत्ता व सोन्याची माहितीमीना माहुरे, पती व मुलगा या तिघांच्या नावे  असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची अधिकाधिक  माहिती घेण्यात येत आहे. यासोबतच त्यांच्याकडे  असलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व  प्लॅटीनमसह अन्य दागिन्यांचा शोध घेण्यात येत आहे.नर्सिंग महाविद्यालयासह संस्थेची तपासणीमीना माहुरे हिच्या अकोला येथील घर व संस्थेच्या  कार्यालयाची झडती घेण्यात येत आहे. तिने आकांक्षा  सोशल वेलफेअर अँन्ड  हयुमन डेव्हलपमेंट  असोसिएशन नावाने संस्था उघडून त्याद्वारे  सार्वजनिक विश्‍वस्त संस्थांचे नर्सिंग महाविद्यालय  उघडले आहे. या संस्थेची ती २00३ ते २00८ मध्ये  सदस्य होती. संस्थेमार्फत २ कोटी ७0 हजार ७१८ रु पयांची अपसंपदा गोळा केल्याचे एसीबीच्या त पासणीत समोर आले आहे.अकोट येथील प्लांटची तपासणीमीना माहुरे हिचा अकोट येथे वॉटर प्युरीफायर प्लांट  असून, या प्लांटसह अन्य प्रतिष्ठानांची झाडाझडती  घेण्यात येत आहे. एसीबीने चारही बाजूने जोरदार त पासणी सुरू केली असून, आणखी मोठे घबाड बाहेर  येण्याची शक्यता आहे.

पोलीस कारवाईअकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने  अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती मनोहर  रामभाऊ माहुरे व मुलगा स्वप्निल  या तिघांविरुद्ध अ पसंपदा प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला.