शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चढ-उतारातूनच आयुष्य समृद्ध होते- सावजी

By admin | Updated: September 5, 2016 02:48 IST

जीवनातील अनुभवातून जिवन अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन डॉ. अविनाश सावजी यांनी केले.

अकोला, दि. ४ : कधी काळी जेव्हा सायकलीने फिरायचो तेव्हा मार्गावर अनेक ठिकाणी चढ-उतार अनुभवाला यायचे. चढाव आला की जोर लावून पायडल मारायचो, त्यानंतर उतार आला की, हायसे वाटायचे. याचे तेव्हा काही नवल नव्हते; मात्र आता त्या चढ-उताराचे महत्त्व जाणवते. मार्गातील चढ-उताराच्या अनुभवातून धडे मिळतात, आयुष्य अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन प्रयास सेवा अंकुर या अमरावती येथील सामाजिक संस्थेचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांनी केले. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित प्रख्यात अस्पायर शैक्षणिक संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. दुसरे प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष पी.नाथ दंदे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ऐश्‍वर्या सहस्त्रबुद्धेच्या स्वागत गीताने झाली. अल्पावधीतच अकोल्यातून देश-विदेशात कीर्ती मिळविलेल्या अस्पायरची माहिती संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे यांनी प्रास्ताविकतेतून दिली. अस्पायरमध्ये सवरेत्कृष्ट सिद्ध झालेल्या १६ विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वर्षातील सवरेकृष्ट विद्यार्थिनी प्रशांती बाठी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. सावजी म्हणाले की, आयुष्यातील चढ-उताराला घाबरण्यापेक्षा त्यातून धडा घेत घडले पाहिजे. ओक हॉल उभे राहण्यासाठीदेखील जागा नव्हती, एवढी गर्दी झाली होती. कॅन्सर पीडित शहादीदी नामक गरजवंत महिलेसाठी स्वत:च्या खिशातून साडेतीन लाख रुपये खर्च करणारे डॉ.पी. नाथ दंदी यांनी भाषणातून पर्यावरणावपर भर दिला. वनराईच्या उपक्रमाची माहितीही त्यांनी येथे दिली. रुग्णसेवेतून माणसे जोडण्याची माहितीही त्यांनी येथे दिली. जीवनाचे विचार सकारात्मक करण्याच्या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अस्पायरचे कौतुक केले. आत्महत्या होत असलेल्या या परिसरात नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य अभिमानास्पद आहे. अशैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणार्‍या या संस्थेने सकारात्मक विचार आणि आत्मविश्‍वास पेरण्याचे कार्य केले, असे ते म्हणालेत. कार्यक्रमात अस्पायरच्या आठ वर्षातील बुलेटीनच्या वाचनातून संस्थेच्या प्रगतीच्या टप्प्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा कुळकर्णी आणि रोशनी जेठानी यांनी केले.