शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांवर अविश्‍वासाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:39 IST

अकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्‍वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे.  

ठळक मुद्देमहापालिका सत्ताधार्‍यांसह विरोधकही सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्‍वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे.  आयुक्त अजय लहाने स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत  सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांसोबत त्यांचे खटके उडाले. सत्ताधारी भाजपातील गटबाजीचाही त्यांना सामना करावा लागला. विजय अग्रवाल यांनी महापौर पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी व नंतरही काही दिवस अग्रवाल व आयुक्त लहाने यांचे फारसे पटत नव्हते. काही कालावधीनंतर मात्र सर्व काही सुरळीत झाल्यामुळे की काय, ‘अमृत’ योजनेंतर्गत ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना, ७९ कोटींची भूमिगत गटार योजना निकाली काढण्यावर महापौर अग्रवाल आणि आयुक्त लहाने यांच्यात एकमत झाले. दोन्ही योजनांना मंजुरी देण्यास शासन सकारात्मक असल्याचे दिसताच पुन्हा एकदा आयुक्त अजय लहाने यांच्या विरोधातील राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकार्‍यांनी स्वपक्षीय नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांना एकत्र करीत आयुक्त लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत बैठक पार पडणार असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती आहे. 

मनपात संभ्रमाची स्थिती- मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणार्‍या ‘स्थापत्य’ कन्सल्टन्सीचा विषय असो किंवा अमृत योजनेतील ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना किंवा ७९ कोटींच्या भूमिगत गटार योजनेची मंजुरी व अंमलबजावणीच्या मुद्यावर खुद्द भाजपातच अंतर्गत कलह आहेत. - सत्ताधार्‍यांच्या चुकीवर बोट ठेवण्याची जबाबदारी असणार्‍यांविरोधी पक्षाच्या तंबूत कमालीची शांतता आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवक कोणाबद्दल काय बोलतील, अन् काय निर्णय घेतील,याविषयी अविश्‍वासाचे वातावरण आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापालिकेत संभ्रमाची स्थिती आहे.