शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांवर येणार गंडांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:29 IST

अप्रशिक्षित शिक्षकांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी प्रशिक्षण घेण्यास बजावले आहे. अन्यथा, या अप्रशिक्षित शिक्षकांनी घरी बसण्याची तयारी करावी, असा इशाराही दिला आहे. 

ठळक मुद्देप्रशिक्षित व्हा; अन्यथा घरी बसा विद्या प्राधिकरण संचालकांचा आदेश

नितीन गव्हाळे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा करतात. इंग्रजी, सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षण देण्याच्या भूलथापा पालकांना देतात; परंतु प्रत्यक्षात अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये डीएड, बीएड शिक्षक नसून, पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हय़ातील अनेक अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये शिकविणार्‍या अप्रशिक्षित शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्यावर लवकरच गंडांतर येणार आहे. या अप्रशिक्षित शिक्षकांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी प्रशिक्षण घेण्यास बजावले आहे. अन्यथा, या अप्रशिक्षित शिक्षकांनी घरी बसण्याची तयारी करावी, असा इशाराही दिला आहे. राज्यातील अनेक अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये पदवीधर शिक्षक तुटपुंज्या वेतनावर विद्यादानाचे काम करीत आहेत. अनेक शिक्षक अप्रशिक्षित असूनही विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. अनेक शाळा दर्जेदार, सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षण देण्याचा दावा करतात. त्यांच्या दाव्यांना बळी पडून पालकही हजारो रुपये डोनेशन भरून शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देतात; परंतु या शाळांमधील शिक्षक वर्ग प्रशिक्षित आहे किंवा नाही, हे पडताळून पाहत नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी डीएड, बीएड ही पदविका प्राप्त करून घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता दिलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राज्य शासनाच्या प्रशिक्षण योजनेमध्ये किंवा नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग (एआयओएस) योजनेंतर्गत डीएड, बीएड पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. त्यासाठी अप्रशिक्षित शिक्षकांनी शासनाच्या स्वयं पोर्टलवर १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २0१७ पर्यंत अर्ज करावे. पदविका प्राप्त नसणार्‍या शिक्षकांना यापुढे काम करता येणार नसल्याचे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी बजावले आहे. 

आरटीई अँक्टनुसार अप्रशिक्षित शिक्षकांना आता शाळांमध्ये शिकविण्यास मनाई आहे. त्यांनी डीएड, बीएड पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यासाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. अप्रशिक्षित शिक्षकांनी अधिक माहितीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे संपर्क साधावा. - प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी माध्यमिक