शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पातुर तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने तीन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सहा ते सातच्या दरम्यान रौद्र रूप धारण केलं. प्रचंड सोसाट्याचा वारा मेघगर्जना ...

शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सहा ते सातच्या दरम्यान रौद्र रूप धारण केलं. प्रचंड सोसाट्याचा वारा मेघगर्जना मुसळधार पावसासोबत १० गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे लिंबू, हरभरा,गहू, आंबा, फुलवर्गीय पिके काकडी ,मका, भुईमुग, सह इतर पिके मिळून तीन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील लेमन विलेज व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवरासह अनेक गावांमधील लिंबू गारपिटीमुळे पूर्णतः गेला आहे. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे नुकसान झालं होतं. अस्मानी संकटामुळे आम्हा शेतकऱ्यांवर फार माेठे ओढवल्याचे उपसरपंच अमर पजई यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई सोबतच विशेष शेतकरी पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख यांनी केली आहे. तहसीलदार दीपक बाजड तालुका कृषी अधिकारी डी. एस. शेटे यांनी रविवारी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना गावागावांमध्ये जाऊन प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.