शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

डाकसेवक संघटनेचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:56 IST

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वेतन आयोग लागू करण्यास शासनाकडून होत असलेल्या चालढकलीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच इतर मागण्यांच्या सर्मथनार्थ अखिल भारतीय डाकसेवक संघटनेने बुधवार, १६ ऑगस्टपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला असून, या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला विभागातील डाकसेवकही बेमुदत संपावर गेले आहेत.कमलेशचंद्र यांच्या वेतन आयोगाने अहवाल सादर करून दीड वर्षांचा कालावधी ...

ठळक मुद्देवेतन आयोग लागू करण्याची मागणीअकोला विभागातून १00 टक्के कर्मचारी संपावर

 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वेतन आयोग लागू करण्यास शासनाकडून होत असलेल्या चालढकलीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच इतर मागण्यांच्या सर्मथनार्थ अखिल भारतीय डाकसेवक संघटनेने बुधवार, १६ ऑगस्टपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला असून, या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला विभागातील डाकसेवकही बेमुदत संपावर गेले आहेत.कमलेशचंद्र यांच्या वेतन आयोगाने अहवाल सादर करून दीड वर्षांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही शासनाकडून आयोगाची अंमलबजावणी झाली नाही. याबाबत संघटनेने एप्रिल महिन्यात संपाचा इशारा दिल्यानंतर सरकारने दोन महिन्यांत आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्‍वासन दिले. ही घडामोड होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही वेतन आयोग लागू झाला नाही. उलट आयोगाच्या शिफारशींमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न डाक विभाग करीत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. तातडीने आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, डिपार्टमेंटल पेन्शन देण्यात यावे व आठ तास काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी संघटनेने देशभर संप पुकारला आहे. अकोला विभागातून १00 टक्के कर्मचारी संपावर असल्याचे विभागीय सचिव तथा सहसचिव महाराष्ट्र सर्कल हेमंत कुमार फाटकर यांनी कळविले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला येथील मुख्य डाकघरासमोर कर्मचारी संपावर बसले आहेत. यामध्ये पी. पी. बोळे, डी. पी. तायडे, आर. डी. नांदुरकर, गोपाल पवार, डी. एच. खडसे, सागर गव्हाळे, मनोज पारसकर, एम. एस. काळे, एम. के. शर्मा, आर. आर. थोरात, जगताप, राहुल वाहुरवाघ, अंभोरे, गोपाल अमतकर, व्ही. एस. बागडे, निकोसे, डाबेराव आदी कर्मचारी उपस्थित होते. मागण्या मंजूर होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे विभागीय अध्यक्ष बी. बी. ओझा यांनी कळविले आहे.