शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या पावसाचा तडाखा, सहा मेंढ्या ठार; २४ तासांत सरासरी ३२.६ मिमी पाऊस

By रवी दामोदर | Updated: November 27, 2023 18:08 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार रविवार, दि. २६ नोव्हेंबर व सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दोन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा जिल्ह्याला बसला आहे. गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३२.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसात रात्रभर भिजल्याने बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात सहा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर पाऊस सक्रिय झाला असून, रविवारी रात्री सातही तालुक्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरला तर वेचणी राहिलेल्या शेतातला कापूस ओला झाला. शिवाय ढगाळ वातावरण व पावसामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली. भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.वातावरणातील बदलाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी आलेली आहे. अशातच रविवारी रात्री १२ ते साडेबारा वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

मृतक मेंढ्यांचा झाला पंचनामा

बाळापूर तालुक्यातील कसुरा साझामधील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात अवकाळी पावसामुळे सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच महसुल विभागाच्या तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील शालीग्राम तुकाराम बिचकुले यांनी स्वत:च्या मालकीच्या मेंढ्या खरबी शिवारात बसविल्या होत्या. रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच मेंढ्या व एक पिल्लू अशा सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बिचकुले यांनी पशुंचा विमा काढलेला नसल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. 

टॅग्स :Akolaअकोला