शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा ६३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका! ८३२ गावांमध्ये झाले नुकसान 

By रवी दामोदर | Updated: December 9, 2023 17:42 IST

अकोला जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले.

अकोला : जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून, सात तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात संयुक्त पंचनामे सुरू असून त्यानंतर अंतिम प्रस्ताव शासनाला मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे.

यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने खरीप हंगामात पेरण्या उशिराने झाल्या. त्यात शेतात पीक बहरलेले असताना तब्बल दीड महिना पावसाने खंड दिल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पेरणी केली, परंतु दि. २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जिल्ह्यात सलग पाच दिवस अवकाळीने धुमाकूळ घातला. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापसासह हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुसरीकडे सकाळच्या धुक्यामुळे तुरीला फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात दि.२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत सातही तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे. सध्या जिल्ह्यात पंचनामे सुरूच असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. सातही तालुक्यात नुकसानजिल्हा प्रशासनानुसार सुरुवातीला केवळ तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. परंतु आता अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यातसुद्धा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. ८३२ गावांना बसला फटकाअवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीचा जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांना फटका बसला आहे. त्यामध्ये  अकोला तालुक्यातील  ३५ गावे,  बार्शीटाकळी तालुक्यातील १६० गावे, मूर्तिजापूर तालुक्यातील १६६ गावे, अकोट तालुक्यातील १८६ गावे, तेल्हारा तालुक्यातील ७८ गावे, बाळापूर तालुक्यातील ११३ गावे, पातूर तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Akolaअकोला