शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट

By admin | Updated: March 1, 2016 01:34 IST

गहू, हरभरा, संत्री, डाळिंब, केळी पिकांची नासाडी.

अकोला: जिल्ह्यात रविवारी रात्री गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा, सूर्यफूल या पिकांसह फळबागांना सर्वाधिक फटका बसला. बहुतांश गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली; मात्र अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकाळी, पातूर तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा व फळबागांचे नुकसान झाले. काही गावांमध्ये गव्हाचे पीक जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी दाण्याच्या दर्जावर पावसाचा परिणाम होणार असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. दोनद व कानशिवणी परिसरात पाऊस झाला. यामुळे पिकाला कमी बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने पावले उचलून नुकसानभरपाईचा निर्णय घ्यावा व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट; २५0 हेक्टरवरील पिकांचे नुकसानबाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा २५0 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. वादळी वार्‍यासह पाऊस झाला तसेच लिंबाएवढय़ा गारा पडल्या. त्यामुळे महागाव, मांगूळ, मिर्झापूर, दगडपारवा, रेडवा, काजळेश्‍वर, पुनोती बु., पुनोती खु. परिसरातील पिकांची नासाडी झाली. काही घरांवरील टिनपत्रे उडाली. रब्बी गहू, हरभरा, कांदा ही पिके जमीनदोस्त झाली. २0 मिनिटांपर्यंत गारांचा वर्षाव झाला. जवळपास दीड तास जोरदार पाऊस झाला. महागावात घरावरील कौले फुटली. रेडवा गावातही गारा पडल्या. अनेक गावांमध्ये पाने गळून झाडे निष्पर्ण झाली. नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे तहसील कार्यालयाने कळविले आहे.