शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँक फोडणार्‍या अट्टल चोरट्यास तीन तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:47 IST

अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापड बाजार परिसरात असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सोमवारी मध्यरात्री प्रवेश करून बँकेत चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास सिटी कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत मंगळवारी पहाटेच म्हणजेच तीन तासाच्या आत अटक केली.

ठळक मुद्देसिटी कोतवाली व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईमहाराष्ट्र बँकेत घडला चोरीचा प्रकारचोरट्याच्या नावावर ३५ घरफोड्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापड बाजार परिसरात असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सोमवारी मध्यरात्री प्रवेश करून बँकेत चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास सिटी कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत मंगळवारी पहाटेच म्हणजेच तीन तासाच्या आत अटक केली. सदर चोरट्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस क ोठडी सुनावली.जुने शहरातील रहिवासी शेख कासम शेख कबीर याने सोमवारी रात्री उशिरा कापड बाजारातील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत प्रवेश केला. महाराष्ट्र बँकेच्या मुख्य द्वाराला खालच्या बाजूने सडलेले लाकूड असल्याने हे लाकूड तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेच्या सुरुवातीलाच असलेल्या एका ड्रावरमधील ५00 रुपयांची नोट चोरी केली. ही नोट घेतल्यानंतर त्याने स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मंगळवारी पहाटेपर्यंत त्याला स्ट्राँग रूमचा दरवाजा न उघडल्याने तो उजेड होण्याआधी बँकेतून पळून गेला. हा प्रकार सकाळीच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. बँकेत पंचनामा करून चोरट्याचा शोध सुरू केला. तीन तास होण्याच्या आधीच या चोरीतील अट्टल चोरटा शेख कासम शेख कबीर याला अटक केली. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नशेत तर्र असताना त्याने बँकेत चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे व कर्मचार्‍यांनी केली.

चोरट्याच्या नावावर ३५ घरफोड्याशेख कासम हा अट्टल चोरटा असून, त्याने आतापर्यंत तब्बल ३५ घरफोड्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. मंगळवारी पहाटेही तो चोरी करून पसार होणार होता; मात्र यथेच्छ मद्यप्राशन करून असल्याने तो पोलिसांच्या जाळय़ात अडकला. सदर चोरट्याकडून आणखी काही चोर्‍यांची माहिती मिळणार आहे.