शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संप अटळ; उद्यापासून महानगरपालिका ठप्प!

By admin | Updated: May 24, 2016 01:40 IST

तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कर्मचार्‍यांचे आंदोलन

अकोला: महापालिका कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले असून तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्यामुळे मनपा कर्मचारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले आहे. बुधवारपासून महापालिकेचे कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघर्ष समितीने सोमवारी जाहीर केला.मनपा क्षेत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू झाल्यानंतर मनपाने दर महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपये ह्यएलबीटीह्ण वसूल केला होता. यामुळे मनपा कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निकाली निघाली होती. अवघ्या वर्षभरात शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे मनपाच्या प्रमुख उत्पन्नाचा मार्ग बंद पडला. एलबीटीच्या बदल्यात शासनाने महिन्याला ४ कोटी २२ लाख रुपये देऊ करण्याची भूमिका घेतली होती. नंतर मात्र एलबीटीच्या अनुदानात कपात केल्यामुळे कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या पुन्हा निर्माण झाली आहे. तूर्तास कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत असून चौथ्या महिन्याला सुरुवात झाली आहे. थकीत वेतनाच्या मुद्यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने अखेर मनपा कर्मचारी संघर्ष समितीने बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.