शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा प्रचार जोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:15 IST

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये एकूण २0५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वीच ७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. उर्वरित उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून, उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर देत आहेत. अकोला जिल्हय़ातून तब्बल ३५ उमेदवार विविध मतदारसंघांतून एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. 

ठळक मुद्देअकोला जिल्हय़ातून विविध गटांत ३५ जण रिंगणात

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये एकूण २0५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वीच ७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. उर्वरित उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून, उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर देत आहेत. अकोला जिल्हय़ातून तब्बल ३५ उमेदवार विविध मतदारसंघांतून एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. सिनेट, विद्वत, अभ्यास मंडळ आदी प्राधिकारिणीवर प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्राचार्य मतदारसंघ, महिला व्यवस्थापन मतदारसंघ, महिला प्रवर्ग, संस्था प्रतिनिधी, विद्यापीठ शिक्षक गट, पदवीधर मतदारसंघासोबतच कला, वाणिज्य, विज्ञान विभाग, मराठी, इंग्रजी, हिंदी, संगीत, सामाजिकशास्त्र, शारीरिक शिक्षण आदी मतदारसंघामध्ये उमेदवार उभे ठाकले आहेत. १५ ऑक्टोबर रोजी ६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.  उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला असून,  विद्यापीठातील समस्या,  मार्गी लावण्याचे आश्‍वासन उमेदवारांकडून दिली जात आहेत.  जवळपास १६ हजारांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यासोबतच व्हॉट्स अँप, फेसबुकच्या माध्यमातूनही उमेदवार प्रचार करीत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राधिकारिणी निवडणुकीत यापूर्वीच तब्बल ७७ उमेदवारांची अभ्यास मंडळ, विद्वत परिषदेवर दोन आणि एकाची सिनेटवर अविरोध निवड झाली आहे. आता २0५ उमेदवारांमध्ये विविध मतदारसंघांमध्ये थेट लढत होणार आहे. 

अकोला जिल्हय़ातून विविध गटांत ३५ जण रिंगणातप्राचार्य, विद्यापीठ शिक्षक, पदवीधर, शिक्षक प्रतिनिधी, संगीत, यासह इतर गटातून डॉ. श्रीप्रभू चापके, डॉ. मधुकर पवार, डॉ. अंबादास कुलट, डॉ. जगदीश साबू, डॉ. संतोष ठाकरे, संस्था प्रतिनिधी गटातून तुळशीदास मिरगे, डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. ममता इंगोले, प्रा. विवेक हिवरे, रवींद्र मुंडरे, डॉ. डी.ई. उंबरकर, अनिता काळमेघ, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, संजय देशमुख, उमेश कुळमेथे, समीर गडकरी, गजानन मानकर, रवींद्र तायडे, प्रदीप थोरात, अनिता चोरे, विवेक बोचे, श्रीकांत सातारकर, डॉ. मुकुंद इंगळे, डॉ. राजकुमार राठोड, श्रीकृष्ण काकडे, संतोष ठाकरे, डॉ. किरण खंडारे, डॉ. किसन मेहरे, भास्कर पाटील, मो. अमजद काझी, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रशांत कोथे, डॉ. आनंद काळे, डॉ. बंडू किर्दक, संध्या काळे आदी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.