शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 13:55 IST

खा. धोत्रे यांच्या रूपाने पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग आला आहे.

ठळक मुद्देयापूर्वी पश्चिम विदर्भाच्या वाट्याला चार वेळा केंद्रीय मंत्रिपद लाभले.खा. धोत्रे यांच्या निवडीमुळे पाचव्यांदा योग आला आहे.

- आशिष गावंडे

अकोला: खासदार संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर आरू ढ होऊन अकोला जिल्ह्याच्याच नव्हे, तर पश्चिम विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. खा. धोत्रे यांच्या रूपाने पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग आला आहे. खा. धोत्रे यांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.विदर्भाचा रखडलेला अनुशेष दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे. २०१४ मध्ये मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा समावेश करण्यात आला होता. नितीन गडकरी यांनी विदर्भात रस्त्यांचे जाळे विणण्यासोबतच नदी खोलीकरणाला प्राधान्य दिले. संपूर्ण विदर्भात व त्यातही पश्चिम विदर्भातून भाजप-शिवसेनेला जनतेची नेहमीच साथ मिळाल्याचे दिसून येते. अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा तब्बल २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेऊन दमदार विजय मिळवित जिल्ह्यात विक्रम केला. यात भरीस भर खा. धोत्रे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने जिल्ह्यात नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी पश्चिम विदर्भाच्या वाट्याला चार वेळा केंद्रीय मंत्रिपद लाभले असून, खा. धोत्रे यांच्या निवडीमुळे पाचव्यांदा योग आला आहे.असे होते पश्चिम विदर्भातील केंद्रीय मंत्री* अमरावती येथून काँग्रेसचे तत्कालीन खा. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड. केंद्रीय मंत्रिमंडळात १९५२-६२ मध्ये देशाचे कृषी मंत्री म्हणून कामकाज सांभाळले.* वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तत्कालीन खा. गुलामनबी आझाद यांची १९८०-८४ या दरम्यान केंद्रीय कायदा व उद्योग व्यवहार राज्यमंत्रीपदी निवड.* काँग्रेसचे तत्कालीन खा. मुकुल वासनिक यांची बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून १९९३-९६ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास युवक कल्याण व क्रीडा खात्याचे राज्यमंत्रीपदी निवड.* बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तत्कालीन खा. आनंदराव अडसूळ यांची २००२-०४ या कालावधीत केंद्रीय अर्थराज्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.

 

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेAkolaअकोलाpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीakola-pcअकोला