शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नकोशी झाली ‘आनंदी!’

By admin | Updated: March 9, 2017 03:21 IST

पातूर येथे महिला दिनानिमित्त नामकरण सोहळा संपन्न झाला.

पातूर(जि. अकोला), दि. ८- मुलगा होईल, या आशेने वाट पाहताना मुलगीच झाली आणि नको असलेल्या मुलीचे नकोशी असे नामकरण करण्यात आले. या नकोशीच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम जागतिक महिला दिनानिमित्त झाले. पातूरच्या किड्स पॅराडाइजने ८ मार्च रोजी या नकोशीचा नामकरण सोहळा घेऊन तिचे नाव आनंदी ठेवले व तिच्या शिक्षणाचा भार उचलून तिच्या जीवनात आनंद फुलविला.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी पातूरच्या किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलमध्ये महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी शाळेच्या संचालिका ज्योत्स्ना गाडगे व संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी आनंदीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मीरा तायडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, बांधकाम सभापती वर्षा बगाडे, नगरसेविका संध्या जोशी, प्रा. डॉ. ममता इंगोले, तुळसाबाई गाडगे, सरपंच रिना सिरसाट, सत्कारमूर्ती मैनाबाई बोंबटकार, कांचन पुराड, वैशाली कुटे, जिजाबाई शेवलकार, सरस्वताबाई राखोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ह्यजागर महानायिकांचाह्ण हा नाट्यप्रयोग विद्यार्थ्यांंंनी सादर केला. या नाटिकेनंतर पहिल्या नगरसेविका मैनाबाई बोंबटकार, उद्योजक कांचन पुराड, संघर्षशील महिला सरस्वताबाई राखोंडे, वैशाली कुठे, जिजाबाई शेवलकार आदी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. डॉ. ममता इंगोले व मीरा तायडे यांनी मनोगत व्यक्त केले.