शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार योजना आता मजीप्राकडे!

By admin | Updated: December 12, 2014 01:24 IST

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; मनपाच्या कारभारावर नाराजी.

अकोला : मागील आठ वर्षांपासून रखडलेल्या भूमिगत गटार योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार असल्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मनपाच्या धर्तीवर स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा प्रस्ताव (डीसी रूल) नव्याने पाठवल्यास त्याला मंजुरी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले. मनपाच्या समस्या लक्षात घेता, स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. याशिवाय जिल्ह्यातील विविध विकासकामे तसेच प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेसह जिल्ह्याच्या विविध मुद्दय़ांवर मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे आढावा बैठक घेतली. आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे यांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण माहिती यावेळी सादर केली. अकोला शहरासाठी २00६ मध्ये मंजूर झालेली भूमिगत गटार योजना अद्यापही मार्गी लागली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर भूमिगतची अंमलबजावणी यापुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भूमिगतचा प्रलंबित विषय मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्याने शहर स्वच्छतेचा मुद्दा निकाली निघणार आहे. बांधकामासाठी एक चटई निर्देशांक (एफएसआय) पुरेसा नसल्याचा मुद्दा आ.गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला. मनपाने यापूर्वी स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा प्रस्ताव (डीसी रूल) तयार करून त्याला सभागृहाने मंजुरी दिली होती, परंतु हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. त्याला मंजुरी देण्याची मागणी आ.शर्मा यांनी केली असता, ह्यडीसी रूलह्णचा प्रस्ताव नव्याने पाठवा, त्याला मंजुरी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मनपाच्या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.