शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘पंदेकृवि’अंतर्गत तीन कृषी महाविद्यालयांचा प्रवेश नाकारला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:39 IST

अकोला: राज्यातील सुमार दर्जाच्या खासगी सहा कृषी महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशावर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील तीन कृषी महाविद्यालयांचा समावेश  आहे. डॉ. पुरी समितीने दिलेल्या अहवालानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त  ९ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले  होते.

ठळक मुद्देराज्यातील सहा महाविद्यालयांचा समावेश सुमार दर्जामुळे ‘एमसीईएआर’ने केली कारवाई! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील सुमार दर्जाच्या खासगी सहा कृषी महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशावर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील तीन कृषी महाविद्यालयांचा समावेश  आहे. डॉ. पुरी समितीने दिलेल्या अहवालानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त  ९ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले  होते.राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शासनाने त्रयस्त समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू  डॉ. एस.एन. पुरी आहेत. या समितीला राज्यातील काही कृषी महाविद्यालये मूल्यमापनात ‘ड’ श्रेणीत आढळली आहेत. त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वसतिगृह तसेच वाचनालय, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी लागणारे जमीन फॉर्म नसल्याचे समोर आल्याने, डॉ.एस.एन. पुरी समितीने मागच्याच आठवड्यात  एमसीईएआरला अहवाल सादर केला होता. त्यातील सुमार दर्जाच्या सहा महाविद्यालयांची नावे समोर आल्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने यावर्षी या महाविद्यालयांना बीएसी कृषी प्रथम वर्षांसाठीचा प्रवेश नाकारला आहे. यामध्ये विदर्भातील तीन महाविद्यालयांचा समावेश असून, अकोला जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील शिर्ला येथील सुमित्राबाई अंधारे, भंडारा जिल्हय़ातील केसलवाडा येथील सेवकभाऊ वाघाये कृषी महाविद्यालय आणि अमरावती जिल्हय़ातील तिवसा येथील आर.जे. देशमुख कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. 

महाविद्यालयांना एक संधीज्या सुमार दर्जाच्या महाविद्यालयांवर बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश बंदी घालण्यात आली आहे, ही एक वर्षासाठीची आहे. या महाविद्यालयांनी पुढच्या एका वर्षात दर्जा सुधारल्यास पुन्हा प्रवेश सुरू  करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बीएससी भाग २ व ३ च्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू  आहे. 

राज्यातील कृषी महाविद्यायाच्या मूल्यमापनासाठी शासनाने माजी कुलगुरू  डॉ.एस.एन. पुरी यांची एक त्रयस्त समिती नेमली होती. या समितीने तपासणीनंतर एमसीईएआरला अहवाल सादर केला असून, यामध्ये राज्यातील सहा कृषी महाविद्यालये सुमार दर्जाची आढळली आहेत. यामध्ये विदर्भातील तीन महाविद्यालयांचा समावेश असून, त्यांना यावर्षीच्या बीएससी प्रथम वर्षाच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता कृषी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.