शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चालकांना सुरक्षा रक्षक पद देण्यासाठी नियमबाह्य ठराव

By admin | Updated: April 15, 2016 02:12 IST

शासनाचा आदेश डावलून घेतला ठराव, महामंडळाचे बडे अधिकारीही चौकशीच्या फे-यात.

सचिन राऊत/अकोला अस्थिव्यंग, अल्पदृष्टी आणि कर्णबधिर असलेल्यांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असताना राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह बड्या अधिकार्‍यांनी २0१२ मध्ये नियमबाह्य ठराव घेऊन चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नेमणूक देण्याचे परिपत्रक काढल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई कार्यालयाच्या परिपत्रकानंतरच अकोला विभागातील २६ चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती असून, हे बडे अधिकारीही आता चौकशीच्या फ ेर्‍यात सापडले आहेत.अस्थिव्यंग, कर्णबधिर व अल्पदृष्टी अशा प्रकारचे आजार असलेले चालक तसेच सुरक्षा रक्षक पदासाठीही अपात्र असून, त्यांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसल्याचा शासनाचा आदेश आहे; मात्र राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, कर्मचारी वर्ग अधिकारी (महाव्यवस्थापक), मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे प्रतिनिधी संचालक व संचालक मंडळ शासकीय यांनी २0/१२:0६:१८ या क्रमांकाचा २0 जून २0१२ रोजी ठराव घेऊन चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्याचे परिपत्रक काढण्यात आले. हे परिपत्रक एसटीच्या राज्यातील सर्वच विभागांना दिल्यानंतर विभाग नियंत्रकांनी या परिपत्रकानुसार चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती दिल्याचे समोर आले. यासाठी अकोल्यातील विभाग नियंत्रकांनी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन मागविले असता, त्यांनी परिपत्रकानुसार चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्याचे स्पष्ट करण्यात आले.