शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

विनापरवाना मिरवणूक; १९ जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Updated: February 25, 2017 02:09 IST

मेहकर येथील प्रकार; शिवसेनेच्या एका जि.प. सदस्याने काढली विनापरवाना विजयी मिरवणूक.

मेहकर, दि. २४- २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले. यावेळी शिवसेनेच्या एका जि.प. सदस्याने पोलीस स्टेशनची परवानगी नसताना गावामध्ये विजयी मिरवणूक काढली. त्यामुळे पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.बोरी ता.मेहकर येथील मनीषा संतोष चनखोरे या शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सोनाटी सर्कलमधून विजयी झाल्या. त्यामुळे विजयाचा आनंद म्हणून संतोष चनखोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोरी गावामध्ये विजयी मिरवणूक काढली होती. दरम्यान, पोलीस स्टेशनची परवानगी नसताना सदर मिरवणूक काढून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, पोलिसांनी संतोष जनार्दन चनखोरे, किशोर चनखोरे, महेश चनखोरे, निकलेश बचाटे, शेखर आव्हाळे, भागवत चनखोरे, रामदास चनखोरे, स्वप्निल नरवाडे, ओमप्रकाश चनखोरे, प्रकाश बचाटे, नामदेव बचाटे, अनिल चनखोरे, रणजित नखाते, बबन ऊर्फ गजानन चनखोरे, मदन चनखोरे, सचिन चनखोरे, अनंता चनखोरे, ज्ञानेश्‍वर ढेंगळे, देवीदास चनखोरे यांचेविरुद्ध फिर्यादी पोउनि रामप्रसाद चामलाटे यांचे फिर्यादीवरुन अप नं.३८/१७ कलम १३५ मुपोकॉ व १८८ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.