शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात विनापरवाना कीटकनाशकांचा साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:43 IST

अकोला : पश्‍चिम विदर्भात विनापरवाना (अप्रमाणित) कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामातून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तासमोर होणार आहे. पश्‍चिम विदर्भात बोगस खते, बियाणे तसेच कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मागील काही वर्षात अशी अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. परंतु, अद्याप एकही ठोस कारवाई न झाल्याने कृषी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

ठळक मुद्दे‘मृत्यू’ ची फवारणीकृषी आयुक्तांपुढे होणार सुनावणी

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भात विनापरवाना (अप्रमाणित) कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामातून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तासमोर होणार आहे. पश्‍चिम विदर्भात बोगस खते, बियाणे तसेच कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मागील काही वर्षात अशी अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. परंतु, अद्याप एकही ठोस कारवाई न झाल्याने कृषी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात २७ पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. यातील अनेक जणांची दृष्टी गेली. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक २0  शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, ४0३ शेतमजुरांना विषबाधा झाली. अकोला जिल्हय़ात सहा मूत्यू, तर १0५ च्यावर मजुरांना विषबाधा झाली होती. विषबाधेचा हा आकडा वाढतच आहे. कृषी विभागाला आता जाग आली असून, शेतकरी, शेतमजुरांना फवारणी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एक दिवस कार्यशाळा घेण्यात आली. पण, विनापरवाना तसेच बोगस कीटकनाशकासंदर्भात एकही ठोस कारवाई झालेली नाही. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज २ मध्ये माहेश्‍वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅर कंपनी फेज २ प्लॉट न. एफ -२२ मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणाहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविले जात होती. गुणनियंत्रण विभागाने मागील आठवड्यात येथे छापा टाकला होता. कीटकनाशकांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, कंपनीच्या संचालकाकडे विक्रीची कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे विभागीय गुणनियंत्रक विभागाच्या चमूने दोन्ही ठिकाणचे गोदाम सील करू न तण व कीटकनाशके जप्त केली आहेत.

२,९0९ लीटर कीटकनाशके जप्त!येथील एका गोदामातून रेम्बो जिब्रालिक अँसीड, रेनफिट प्रेटिकाक्लोर,ऑक्सीजन ट्रायाकॉन्टानॉल एकूण २,१३४ लीटर किंमत १४ लाख ९६ हजार ६८८ रुपयांचे जप्त केले. तर दुसर्‍या गोदामातून ७७५ लीटर पीलर तणनाशक जप्त केले. या रसायनाची किंमत ही ११ लाख ६८ हजार ६९0 रुपये आहे. दोन्हीची किंमत २६ लाख ६५ हजार ३७८ रुपये एवढी आहे. 

अकोल्यात कारवाई पण..पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात अप्रमाणित बियाणे, रासायनिक          खते व कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये अकोला जिल्हय़ात २ हजार ९१४ लीटर कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. याची किंमत २६ लाख ६८ हजार रुपये आहे. पण, पुढील ठोस कारवाईच होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

ठोस कारवाई नाही!कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने गोदाम सील केले, पण ठोस कारवाई अद्याप झाली नाही. हे प्रकरण कृषी आयुक्तांकडे प्रस्तावित आहे. कृषी आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळात अधिकारी दाखल!यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणात विभागीय गुणनियंत्रण विभागाची चमू सोमवारी यवतमाळ पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. संबंधित कंपनी, विक्रेत्यांविरुद्ध तक्रार देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

आयुक्तांपुढे सुनावणी केव्हा ?अकोल्यात अप्रमाणित कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. हे प्रकरण कृषी आयुक्ताच्या दरबारात पोहोचले असल्याचे वृत्त आहे, पण सुनावणी होणार केव्हा, हा प्रश्न शेतकर्‍यांमधून विचारला जात आहे.

भरारी पथकांची कारवाई सुरू आहे. विभागातील पाचही जिल्हय़ात कीटकनाशक प्रकरणात अकोल्यात विक्रीबंदीचा आदेश काढण्यात आला आहे. अप्रमाणित बियाणे, रासायनिक खतासंदर्भात विक्रीबंदी व जप्तीची कारवाई केली आहे. -डॉ. पी. व्ही. चेडे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी, अमरावती.